गणेशोत्सव २०२३ ला उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात झालेली आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन झालेले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक सुंदर फुलांची आरास करतात आणि सजावट करतात. कित्येक भाविक बाप्पाच्या सजावटीसाठी एकापेक्षा एक कल्पना शोधून काढतात. सोशल मिडियावर लाडक्या बाप्पासाठी केलेल्या सजावटीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, सध्या असाच एका अफलातून सजावटीचा व्हिडीओ समोर येत आहे. हा व्हायरल व्हिडीओ सर्वांना प्रंचड आवडला आहे. सजावटीच्या कल्पनेपासून ते मांडणीपर्यंत सर्वकाही अप्रतिम आहे.
हा व्हिडीओ वेदांत वालकर ( colourmaniac ) आणि मृणमयी (k.mrunmayee) यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर एकत्रितपणे पोस्ट केला आहे. हे दोघेही जे.जे स्कुल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आहे. दोघांनी सुंदर बाप्पाचं घर तयार केलं आहे आणि गणरायाच्या सेवेसाठी उंदीरमामा देखील दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंदीर मामा बाप्पाची सेवा कशी करत आहेत. भक्तांच्या इच्छा बाप्पापर्यंत पोहचवण्यापासून बाप्पासाठी मोदक तयार करण्यापासून सर्व कामे हे उंदीर मामा करताना दिसत आहे.
हेही वाचा – महिलेचा Neck Dance पाहून तुमचीही मान दुखायला लागेल? व्हायरल व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक उंदीर मामा एका टिव्ही स्क्रिनवर सीसीटिव्ही फुटेज पाहताना दिसत आहे. त्याच्या मागे एक कॉप्युटर आणि प्रिंटर दिसत आहे. प्रिंटरमधून बाहेर येणाऱ्या प्रिंटचा कागद दिसत आहे. मंदिरात आपण उंदीर मामाच्या कानात आपल्या इच्छा सांगतो त्याचे CCTV फुटेज पाहून एक उंदीर भक्तांच्याच्या सर्व इच्छा टाइप करून त्याची प्रिंट काढत आहे आणि बाप्पापर्यंत पोहचत आहे असे हे दृश्य आहे.
नंतर एकीकडे बाप्पाला सर्वांच्या घरी जायचं आहे म्हणून दोन उंदीरमामा त्याचे सर्व दागिणे साफसफाई करताना दिसत आहे तर दुसरीकडे एक उंदीरमामा फुलांची सजावट करत आहे आणि त्यात पाय अडकून पडलेला दुसरा उंदीर मामा दिसतो आहे. बाप्पाला स्वच्छता आवडते म्हणून साफसफाई करताना दोन उंदीर मामा देखील दिसत आहे.
भाविकांकडून आलेले नारळ मोजताना एक उंदीर मामा दिसतो आहे तर त्याच नाराळाचे मोदक तयार करण्यासाठी घेऊन जाणारा एक उंदीर मामा दिसतो आहे.
एका ठिकाणी बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक बनवण्याचे काम सुरू आहे. यात दोन उंदीर मामा खोबरं किसताना दिसत आहे, तिसरा उंदीरमामा गुळ फोडताना दिसत आहे तर चौथा उंदीर मामा गरमा गरम मोदक तयार करताना दिसत आहे.
”आज बाप्पाला कोणता पिंताबर देऊ बरं…?” हा विचार करत बसलेला उंदीर मामा दिसतो आहे तर ”बाप्पा खूप दिसतोय तू ” असं बोलत आरसा दाखवताना उंदीर मामा दिसतो आहे.
एकंदर संपूर्ण देखाव्याची ही कल्पना अप्रतिम आहेच पण त्याची मांडणी देखील अत्यंत सुरेख केली आहे. लोकांना हे बाप्पाचं घर अत्यंत आवडलेलं आहे. व्हिडीओला अनेकांची पसंती मिळते आहेच पण अनेकज कमेंट करून सजावटीचे कौतूक करत आहेत. एकाने कमेंटमध्ये म्हटले की, ”खूप सुंदर पद्धतीने रेखाटला आहे सर्व वाहहहा” तर दुसऱ्याने कमेंट केली, कसली भारी कल्पना आहे, एकच नंबर!”