Viral Video: तुमच्या वागण्याचा दुसऱ्यांवर चांगला,वाईट असा प्रभाव पडत असतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीबरोबर जसे वागलं तशीच समोरची व्यक्ती तुमच्याबरोबरही वागते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी वाईट वागत असाल तर त्याच्याकडून चांगल्यापणाची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणाचा दयाळूपणा पाहायला मिळाला आहे. तरुणाने बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाची एक इच्छा पूर्ण केली आहे ; जी संध्या अनेकांचे मन जिंकत आहे.

अनिश भगत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे ; जो इन्स्टाग्रामवर विविध कन्टेन्ट बनवतो. तर आज तरुण खास व्हिडीओ घेऊन आला आहे ; ज्यात त्याने त्याच्या बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाची एक इच्छा पूर्ण केली आहे. सुरक्षा रक्षक ब्यास ६५ वर्षांचे आहेत. या वयात त्यांना काम करताना पाहून तो एकेदिवशी त्यांना विचारतो ‘तुम्ही या वयात का काम करत आहात?’ तेव्हा सुरक्षा रक्षक सांगतो की, ‘मला एकच मुलगा आहे आणि त्याने मला सोडून दिले आहे.’ तर यावर तरुण म्हणतो की, ‘एक दिवसासाठी मी तुमचा मुलगा आहे असे समजा आणि तुमची एक इच्छा मला सांगा’. तर यावर सुरक्षा रक्षक काय उत्तर देतात व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ex-IAS officer assaulted by bus conducter for not paying ₹10 extra for missing stop FIR lodged
‘फक्त १० रूपयांसाठी सोडली माणुसकी!’ कंडक्टरची वृद्धाला मारहाण, तो होता माजी IAS अधिकारी…Viral Videoमध्ये पाहा काय घडले?
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट

हेही वाचा…रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा! शाकाहारी जेवणात आढळलं झुरळ अन्…; पाहा थक्क करणारा ‘हा’ VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पहिली असेल की, सुरक्षा रक्षक आधी तरुणासमोर बोलायला घाबरतो. पण, नंतर ‘मला राम मंदिराला भेट देण्याची इच्छा आहे’ असे तरुणाला सांगतो. तरुण हे ऐकून त्याच रात्री तिकीट बुक करतो, स्वतःचे कपडे बॅगेत भरतो आणि सुरक्षा रक्षक यांना फोन लावतो. सुरक्षा रक्षक सुद्धा त्यांचे कपडे बॅगेत भरतात आणि दोघांचा प्रवास सुरु होतो. पुण्याहून लखनौला ते दोघे विमानाने जातात. सुरक्षा रक्षक यांचा हा पहिलाच विमान प्रवास असतो.विमान प्रवास ते अयोध्येतील श्री रामाचे दर्शन घेण्यापर्यंतचा हा प्रवास पाहून तुमच्याही डोळ्यात चटकन पाणी येईल.

अयोध्येत श्री राम मंदिराला भेट दिल्यानंतर सुरक्षा रक्षक तिथे प्रार्थना करतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @anishbhagatt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, ‘प्रत्येक वडिलांना असा एक मुलगा असला पाहिजे’. तसेच अनेक जण विविध शब्दांत या तरुणाचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Story img Loader