कोविड महामारीच्या काळात संपूर्ण जगात लॉकडाउन झाले. भारतातही जवळपास तीन महिने लोक आपल्या घरामध्ये बंदिस्त होते. लोक घराबाहेर पडण्यासही इतकी घाबरत होती की कामासाठी ऑफिसला जाणे लांबच राहिले. अशातच बहुसंख्य देशांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सुरुवात झाली. यामुळे लोक आपल्या घरी बसूनच ऑफिसचे काम करू लागले. मात्र आता करोनाची लाट ओसरू लागली असून आपले जीवनही पूर्वपदावर येत आहे. काही नोकरदारांना वर्क फ्रॉम होमचा कंटाळा येऊ लागला आहे. याचाच विचार करून एका पबच्या मालकाने एक खास ऑफर दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्क फ्रॉम होमच्या सुविधेने लोकांच्या जीवनामध्ये मोठा बदल झाला आहे. तथापि, तुम्हालाही या कार्यपद्धतीचा कंटाळा आला असेल तर एका पबने दिलेल्या ऑफरचा तुम्ही विचार करू शकता. या पबने वर्क फ्रॉम होमला कंटाळलेल्या नोकरदारांसाठी एक खास पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजचे नाव आहे ‘वर्क अ‍ॅण्ड प्ले’. यानुसार त्यांना ‘वर्क फ्रॉम पब’ करता येणार आहे.

काळजावर दगड ठेवून अवघ्या तीन वर्षाच्या मुकबधीर मुलाला ट्रेनमध्येच सोडून गेली आई; चिठ्ठीमध्ये लिहिलं, “माझ्यासाठी…”

ब्रिटनमधील पब्स आणि हॉटेल कंपनी ‘यंग ब्रिटन’ आपल्या पब्समध्ये नोकरदारांसाठी खास वर्किंग स्पेस उपलब्ध करून देत आहे. येथे काम करण्यासाठी नोकरदारांना १५ पाउंड म्हणजेच १३०० रुपये द्यावे लागतील. यामध्ये तुम्हाला पबकडून सँडविच आणि अनलिमिटेड चहा किंवा कॉफी दिली जाईल. ‘वर्क फ्रॉम पब’ या प्रोग्राम अंतर्गत, कर्मचार्‍यांना त्यांच्या ऑफिसची जागा इतर लोकांसोबत शेअर करावी लागेल. यामध्ये कर्मचाऱ्यांना पॉवर आउटलेट्स, शांत जागा तर मिळेलच पण त्याचबरोबर त्यांना शिफ्ट संपल्यानंतर पिण्यासाठी मद्य निवडण्याचा पर्याय देखील दिला जाईल.

या योजनेची सुरुवात २०२० साली झाली होती. आता १८५ पेक्षा जास्त यंग पब्समध्ये ही ऑफर दिली जात असून ब्रिटनमध्ये हा ट्रेंड खूपच लोकप्रिय ठरत आहे. वीजबिल जास्त येणे हेदेखील हा ट्रेंड लोकप्रिय ठरण्यामागचं एक कारण आहे. काही ग्राहकांचे म्हणणे आहे की ते घरापेक्षा पबमध्ये काम करणे अधिक पसंत करतात, कारण तेथील वातावरण चांगले आहे.

चार मुलांची आई पडली प्रेमात; पतीला कळत्याच त्याने ‘करवा चौथ’च्या दिवशीच…

ब्रिटनमधील फुलर पब आपल्या ३८० पब्समध्ये केवळ १० पाऊंड म्हणजेच ९०० रुपयांमध्ये कर्मचाऱ्यांना ही सुविधा देत आहे. इतकंच नाही तर ब्रूहाऊस आणि किचनने ‘वर्कस्पेस’ नावाची ऑफर काढली आहे, यामध्ये कर्मचाऱ्यांना वायफाय, शांत एरिया, पॉवर आउटलेट, अनलिमिटेड हॉट आणि कोल्ड कॉफी आणि प्रिंटिंगची सेवा मिळणार आहे.