Boss and employee chat viral: सध्या अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करावं लागतंय. विशेष म्हणजे या कामाचा कोणताही मोबदलाही मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकजण करतात.जगात अगदी मोजक्याच कंपन्या असतील ज्या कामाचे तास, कामाच्या ठिकाणचं वातावरण, कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजा, या सगळ्यांची काळजी घेतात. लाँग वर्किंग आवर्स किंवा ओव्हर टाईम, हे तर भारतातलं अगदी सर्रास दिसणारं चित्रं आहे.मात्र, या लाँग वर्किंग आवर्सचे अत्यंत जीवघेणे परिणाम होऊ शकतात. दरम्यान कर्मचारीही त्यांचा नाईलाज असल्यानं फारसा विरोध करताना दिसत नाहीत. अशाच एका कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसला ओव्हरटाईम करायला लागल्यामुळे असा काही मेसेज केलाय की हा मेसेज पाहून तुम्हीही म्हणाल बरोबर केलं जशास तसं. बॉस आणि कर्मचाऱ्याचे चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता तुम्हीच पाहा की, इथे एक कर्मचारी आणि त्याच्या बॉसचे व्हॉट्सॲपचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बर्‍याच कर्मचार्‍यांसाठी सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे त्यांच्या बॉस किंवा मॅनेजरकडून रजा मंजूर केली जाणे. कारण- कर्मचाऱ्याचा रजेचा अर्ज पाहताच अनेक बॉसना डोकेदुखी होते. जवळ-जवळ प्रत्येक कर्मचारी आपल्या बॉसला कंटाळलेला असतो. तुम्हीही ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की शक्यतो वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. मात्र या Gen Z कर्मचाऱ्याने मॅनेजरला थेट मेसेज केला, यावेळी त्यानं आपली नोकरी जाईल याचाही विचार केला नाही.

Bigg Boss Marathi Fame Ankita Walawalkar And Suraj Chavan
गावी गेल्यावर १ तास थांबले, अनफॉलो केलं अन्..; सूरजच्या गावी अंकिताला काय खटकलं? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
kasba peth in pune
पुण्यातील सर्वात जुनी पेठ! कसबा पेठेचं सौंदर्य दर्शवते पुण्याची संस्कृती, VIDEO एकदा पाहाच
viral video of woman stole a bench outside the building shocking video goes viral on social media
VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

असा काय मेसेज केला?

कर्मचाऱ्याचा मेसेज होता, “हाय सर आणि मॅम मी उद्या सकाळी ११.३० वाजता येईन कारण मी सध्या ८.३० वाजता ऑफिसमधून निघत आहे.” खरंतर, ऑफिसमध्ये शिफ्ट संपल्यानंतरही थांबून काम करणं यात जुन्या पिढीला कोणत्याही प्रकारची अडचण नसते. शिफ्ट संपल्यानंतरही ते थांबतात आणि काही तक्रार न करता ते काम करतात. त्याशिवाय दुसऱ्या दिवशी जी नेहमीची ऑफिसची वेळ आहे त्या वेळेला ऑफिसला हजर राहतात. मात्र, त्यांच्या उलट आत्ताची पिढी हे वेळेत येऊन वेळेत काम संपवून घरी जाणं पसंत करतात. असचं काहीसं वकील आयुषी देसाई यांच्यासोबत झालं आहे. आयुषी देसाई यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ज्युनियरनं शेअर केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांच्या ज्युनियरनं केलेला मेसेज आहे.

पाहा चॅटचा फोटो

हेही वाचा >> PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी कर्मचाऱ्याचे समर्थन केले आणि त्याच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. एका वापरकर्त्याने म्हटले, तरुण कर्मचारी काहीवेळा त्यांच्या आरोग्याशी तडजोड न करता कार्यक्षमता कशी टिकवायची याबद्दल एक ताजेतवाने दृष्टीकोन आणतात!” पारंपारिक कार्यालयीन नियमांच्या विरोधात ठाम भूमिका घेत, आणखी एकानं प्रतिक्रिया देत, “आम्ही हे सगळं सहन करत आलोय पण आमच्या ज्युनियरनी हे बदलले. बरोबर केलं जशास तसं”