जर तुम्हाला मद्यपान करायला आवडत असेल ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चीनमधील मद्य तयार करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपनीतील मोठे प्रकरण समोर आले आहे. या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने बिअर तयार करण्याच्या सामानावर लघवी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चीनच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे.
मद्य तयार करणारी कंपनी ‘सिंगताओ ब्रूअरी’च्या फॅक्टरीमधील हा व्हिडीओ आहे. एक्स (ट्विटर ) CN Wire या अकांउटवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पुरुष कर्मचारी एका उंच भिती असलेल्या कंटनेरवर चढून त्यातील सामानावर लघवी करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर केल्यानंतर १० मिलियन आणि एक कोटी लोकांनी पाहिला आहे ज्यानंतर कंपनीसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, “त्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.”
हेही वाचा – जुगाड असावा तर असा! बाईकपासून तयार केली विचित्र सायकल, व्हायरल व्हिडीओ पाहून हसू आवरणं होईल कठीण
हेही वाचा – केरळमध्ये चहा विकताना दिसले रजनीकांत? जाणून घ्या काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य?
बिअरच्या सुरक्षितवर उभारले प्रश्नचिन्ह
कंपनीने सांगितले की, “सध्या तयार बिअरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे त्यामुळे तयार बिअरच्य़ा बॅचची विक्री रद्द करण्यात आली आहे. कंपनी निर्मिती प्रक्रियेत आणखी सुधारणा करून उत्पादनाची गुणवत्ता वाढण्याचा प्रयत्न करत आहे. ”
सोशल मीडियावर व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले, “माझा सल्ला आहे की, कंपनीने या व्यक्तीला कोर्टात न्यावे आणि त्याच्याकडून नुकसान भरपाई घ्यावी” तर दुसरा व्यक्ती म्हणाला,”हे संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने तपासणी झाली पाहिजे.” एकाने व्हिडीओवर कमेंट केली की, “धन्यवाद, मी आता याऐवजी वाईन पिण्यास प्राधान्य देईल.”
.