भारतातील अनेक लोकं देशी जुगाड करण्यात खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेल्या जुगाडाची भुरळ परदेशातील लोकांना देखील पडल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. शिवाय देशातील लोकांच्या या टॅलेंटची दखल मोठे उद्योजकही घेतात. याच उदाहरण म्हणजे नुकतंच एका मुलाने बनवलेल्या चार्जिंगवर चालणाऱ्या गाडीची दखल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली होती.

त्यामुळे आपल्या देशातील जुगाड किती महत्वाचं आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता. शिवाय या जुगाडामुळे अनेक अवघड कामं सोप्पी होतात शिवाय वेळेची बचत देखील होते. मुळात जुगाड हे आपले शाररिक कष्ट कमी करण्यासाठीच शोधलं जातं. सध्या एका कामगाराने आपल्या कामाचा त्रास कमी करण्यासाठी केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा

हेही वाचा- बायकोच्या मृत्यूनंतर टॅक्सी चालकाने असं काही केलं की…, रात्रीत बनला करोडपती

हा व्हिडिओ पाहून हाय टेक्नॉलॉजीही लाजेल अशा प्रकारची क्रिएटीव्हीटी या कामगाराने केली आहे. एका कामगाराने आपलं काम सोप्पं आणि पटकन होण्यासाठी स्कूटरच्या साहाय्याने विटांची पोती छतावर नेण्यासाठी एक उत्तम पर्याय शोधला आहे. व्हिडिओमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे दिसत आहे. बांधकामासाठी छतावर विटा नेण्याचे अवघड काम सोपे करण्यासाठी एका मजुराने चक्क स्कूटरला मशीन जोडून जबरदस्त जुगाड केलं आहे.

हेही पाहा- Viral Video: अतिउत्साहात तरूणीसोबत डान्स करायला गेला आणि थेट स्टेजमध्ये घुसला

मजुरांनी स्कुटरचे मागील चाक काढून त्याला दोरी गुंडाळलेलं दुसरं चाक जोडलं आहे. या स्कूटरवर एक मजूर विटांनी भरलेली पोती दोरीला बांधतो आणि दोरी बांधल्यानंतर स्कूटरवर बसलेला माणूस हळू हळू एक्सेलरेटर फिरवतो. तो एक्सेलरेटर फिरवेल तसं विटांनी भरलेलं पोतं छतावर जाताना दिसतं आहे. हे पोतं वर पोहचलं की, छतावर असणारा कामगार या विटा बाहेर काढतो आहे. कामगारांनी कामाचा त्रास कमी करण्यासाठी बनवलेल्या या जुगाडाचे नेटकरी तोंडभरुन कौतुक करत आहेत.

कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने व्हिडिओ केला शेअर

हेही वाचा- Ludo च्या नादात नवऱ्याला कंगाल करुन बाईने स्वतःचीच लावली बोली; आता नाईलाजास्तव घरमालकासोबत…

हा व्हायरल व्हिडिओ कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सुनीलने लिहलं आहे की, “स्कूटरची कंपनी ‘बजाजला देखील हे माहित नाही की त्यांच्या स्कूटर अशा प्रकारे वापरल्या जात आहेत.” व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक गमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या कामगारांचे कौतुक केलं आहे. शिवाय ‘इच्छा तिथे जुगाड करता येतोच,’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘हे तंत्रज्ञान भारताबाहेर जायला नको’ अशी कमेंट केली आहे. त्यामुळे आपल्या देशातील जुगाडाची पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Story img Loader