Viral Video : असं म्हणतात, भारतात जुगाडची कमतरता नाही. दरदिवशी अनेक जण नवनवीन जुगाड शोधत असतात. एखाद्या जुन्या वस्तूंपासून उपयोगी नवीन वस्तू बनविणे, यालाच जुगाड म्हणतात. सोशल मीडियावर जुगाडचे अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके हटके असतात की पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या असाच एक जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कामगारांनी सायकलबरोबर अनोखा जुगाड केला आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अनेक सायकल एकाला जोडून चक्क रेल्वेसारखी गाडी बनवली आहे. हा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हा जुगाड आवडू शकतो.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सायकल रिक्षा दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही कामगारांनी अनोखा जुगाड केला आहे. या सायकल रिक्षापासून अनोखी रस्त्यावर धावणारी रेल्वेगाडी तयार केली आहे. कामगारांनी जुगाड करत अनेक सायकल एकमेकांना जुळवून एक लांब गाडी बनवली आहे. ही गाडी पाहून तुम्हाला ही रस्त्यावर धावणारी रेल्वेगाडी वाटेल. त्यांचा हा हटके जुगाड तुम्हालाही आवडेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अनेकदा कामगारांना एकाच वेळी अनेक गोष्टी वाहून नेण्याची वेळ येते पण एका सायकल रिक्षावर त्या वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणे शक्य नसते. अशावेळी हा जुगाड कामी येऊ शकतो. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वस्तूंची ये-जा करता येते. अशा कामांसाठी हा जुगाड फायदेशीर ठरू शकतो. हा एक खूप चांगला जुगाड असून यामुळे जास्तीत जास्त पैसे वाचवता येऊ शकतात.

हेही वाचा : Pune : पुण्यातील हे सुंदर चारभूजा मंदिर पाहिले का? एकदा व्हिडीओ पाहाच…

Mooon_Shinee या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्मार्ट वर्क” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “ट्रायसायकलची ट्रेन” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान आणि नाविन्यपूर्ण” आणखी एका युजरने लिहिलेय, “टीमवर्क” हा जुगाड अनेक युजर्सना आवडला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader