आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजा सहजी मिळत नाही त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आपल्या आसापास असे अनेक लोक असतात जे कितीही कठीण परिस्थिती असली तरी हार मानत नाही, किती वेळा अपयश आले तरी प्रयत्न करतात. असाच संघर्ष आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला येतो. असाच संघर्ष दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय चक्क सिग्नलाला उभे राहून अभ्यास करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भावून झाले तर अनेकांनी त्याचे कौतुक केले.
इंस्टाग्रामवर नावाच्या अकाउंटवर adityapatelwinners हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओनुसार, एक झोमॅटो कर्मचारी दिसत आहे जो फुड डिलिव्हरी करण्यासाठी बाईकवरून प्रवास करत आहे. दरम्यान रस्त्यावर सिग्नल लागलेला असताना हा झोमॅटो कर्मचारी मोबाईलवर अभ्यास करताना दिसत आहे. मोबाईल स्क्रिनवर कोचिंग क्लासचा व्हिडीओ दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्वप्न, परिस्थिती, वेळेचा अभाव आणि सरकारी नोकरी….. “
व्हायरल व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. काहींना व्हिडीओ आवडला. अनेकांनी कौतूक करत व्हिडीओवर कमेंट केल्या. एकाने लिहिले, हा व्यक्ती एक दिवस नक्की यशस्वी होईल. दुसरा म्हणाला, माझा छोटा भाऊ देखील असेच करतो.
हेही वाचा – एका चाकावर बाईक चालवत तरुणाने केला धोकादायक स्टंट; Viral Videoने वेधले बंगळुरू पोलिसांचे लक्ष
तिसऱ्याने म्हटले, भाऊ तुमच्या मेहनतीला सलाम
चौथा म्हणाला, ही मेहनत आणि परिस्थिती सरकारने पाहिले तर बरे होईल.
पाचवा म्हणाला, “प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीची अशी परिस्थिती आहे की पैसे कमावावे की अभ्यास करावा पण हा भाऊ दोन्ही एकाच वेळी करत आहे. तुला नशिबाची साथ मिळो भावा”