जगात काही जणांच्या सण उत्सवाच्या संकल्पना आपल्यापेक्षाही फारच वेगळ्या असतात. आता तुम्ही कधी कल्पनाही केली असेल का की ज्या बिअरचे नाव ऐकल्यावर आपण नाक मुरडतो त्या बिअरचा उत्सवही एका नगरीत साजरा केला जात असेल म्हणून. आता त्या देशातील मद्यपींसाठी हा बिअर फेस्टिव्हल म्हणजे एक पर्वणीच असते. तर जर्मनीमध्ये जगातील सगळ्यात मोठा असा बिअर फेस्टिव्हल भरतो. ऑक्टोबेरफेस्ट नावाचा हा सगळ्यात मोठा बिअर फेस्टिव्हल आहे.
साधरण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात या फेस्टिव्हला सुरुवात होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात हा फेस्टिव्हल चालतो. जवळपास सतरा ते अठरा दिवस तो सुरु राहतो. यंदा हा फेस्टिव्हल १७ दिवस चालणार आहे. जर्मनीच्या म्युनिच शहरात या फेस्टीव्हलला सुरूवात देखील झाली आहे. जगभरातून लाखो लोक फक्त आणि फक्त हा उत्सव पाहण्यासाठी येतात. बिअर वगैरे पिऊन त-हाट व्हायचे असा कोणताच प्रकार येथे नसतो. या उत्सवाच्या काळात या शहरात जर्मन नागरिक आपल्या पारंपारिक वेशात येतात. कार्निव्हल परेड सारखीच येथे देखील परेड असते. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच पारंपारिक वेशभूषा परिधान करुन या उत्सवात आनंदाने सहभागी होतात.
म्युनिच शहराच्या महापौरांनी बिअरच्या बॅरेलचे उद्घाटन करून या फेस्टिव्हलची सुरूवात केली. १८१० पासून हा बिअरचा उत्सव जर्मनीत रंगतो. सर्वाधिक बिअर पिणा-या देशात जर्मनी हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलमध्ये जर्मन जनता सहभागी झाली नाही तर नवलच म्हणावे लागेल.

People dressed in traditional Bavarian clothes take part in the Oktoberfest parade in Munich, Germany, September 18, 2016. REUTERS/Michaela Rehle
People dressed in traditional Bavarian clothes take part in the Oktoberfest parade in Munich, Germany, September 18, 2016. REUTERS/Michaela Rehle

Story img Loader