नारळ हे आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपण जाणतो. तुम्ही नारळाचे महत्त्व जाणत असाल आणि तुम्हाला तुमच्या बागेत नारळाचं झाड लावायचं असेल हा लेख तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला बाजारामध्ये नारळाचे रोपं सहज मिळू शकते पण तुम्हाला स्वत:च्या हाताने नारळापासून त्याचे रोपं तयार करायचे असेल तर आम्ही तुमची मदत करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी नारळाचे झाडं कसं लावावं हे सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये घरच्या घरी नारळाचं रोपं कसं तयार करावे याची पद्धत सांगितली आहे. हा व्हिडीओ सुनिता डोळस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”सहसा आपण जेव्हा नर्सरीमध्ये नारळाचे रोपं आणण्यास जातो तेव्हा आपल्याला ते मोठे झाल्यावर त्याला किती मोठे नारळ येणार, ते गोड असेल की नाही हे माहीत नसते. तो रोपं विकणारा जे सांगेल त्यावरच विश्वास ठेवून ते खरेदी करावे लागते आणि ज्यावेळी ते मोठे होते तेव्हा कळते की फळ खूप लहान आहे. गोड नाही. पण त्यावेळी वेळ गेलेली असते. पण तेच जर आपण आपल्या हाताने चांगल्या जातीचे नारळ आणून रोपं तयार केले तर अशी शंका राहणारच नाही ना .” तुमच्या मनातही सुनिता डोळस यांच्या सारखी शंका असेल त्यांनी सांगितलेली नारळाचं झाड लावण्याची ही पद्धत वापरून पाहा.
हेही वाचा – खोबऱ्यासाठी नारळ आपटून वैतागलात? नारळ फोडण्याची ‘ही’ सोपी पद्धत एकदा वापरून पाहा
हेही वाचा – पुण्यातील रस्त्यावरच्या खड्ड्यांना हार घालून श्रद्धांजली वाहतेय ‘ही’ व्यक्ती? पाहा व्हायरल व्हिडीओ
नारळाचं झाड कसं लावावं?
१. एका डब्यात कडक पाण्यात १०-११ दिवस नारळ भिजत ठेवावे.
२. एका प्लास्टिकच्या पिशवीत नारळाला कोंब येईपर्यंत म्हणजे साधारण २-३ महिने ठेवावे.
३. २-३ महिन्यात त्याला छान कोंब येईल. त्यानंतर त्याला प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढा.
४. एका भांड्यात बागेतील माती, कोको पीट, नीम खली, वर्मी कपोष्ट खत सर्व एकत्र करून घ्यावे.
५. एका कुंडीमध्ये खाली नारळाच्या शेड्या टाकून त्यावर तयार माती थोडी टाकावी.
६. अर्धी कुंडी माती झाल्यावर त्यात कोंब आलेला नारळ मधोमध ठेवा आणि बाजूने माती टाका.
७. नारळाचा कोंब थोडासा दिसेल इतकी माती टाकावी. नतंर त्यात पाणी टाकावे.
८. १५- २० दिवसांनी त्याला नारळाचे रोपं मातीतून बाहेर येईल.
९. एका महिन्यानंतर चांगले वाढलेले नारळाचे छोटेसे रोपं तयार होईल.