गूगल कायमच डूडलच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करुन आपल्या वापरकर्त्यांना अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आज (सेमवारी) असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गूगलने पर्यावरणाचा संदेश देणारे डूडल तयार करुन गूगलच्या वापरकर्त्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे.

आपले आयुष्य गूगलच्या अक्षरांप्रमाणेच रंगीबेरंगी असले तरीही ते पर्यावरणपूरक असणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे गूगलेने अतिशय समर्पक आणि सुटसुटीत डूडल बनवत पर्यावरणालाही महत्त्व द्यायला हवे हे सांगितले आहे. एरवी दिसणारी कलरफूल अक्षरे हिरव्या रंगात रुपांतरीत होतात आणि त्यावरील पानांमुळे झाडे लावण्याचा संदेशही गूगलने दिल्याचे दिसते.

Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
kala lake, Kalyan, Indurani Jakhad, contractor Notice,
कल्याण : काळा तलाव साफसफाईत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कारवाई
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

जगभरात ५ जून हा पर्यावरणदिन म्हणून साजरा केला जात असताना तंत्रज्ञानाचा वापर करतानाच पर्यावरणही जपा असेच गूगलला सांगायचे आहे. आपले आताचे जगणे आणि येणाऱ्या पिढीचे जीवन सुकर होण्यासाठी अशाप्रकारे झाडे लावण्याची आणि त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेण्याची गरज असल्याचे या डूडलमधून सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्रांतर्फे १९७४ मध्ये पर्यावरण रक्षणाचे काम जगभरात करण्यात यावे यादृष्टीने काम सुरु करण्यात आले. सुरुवातीला प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, नैसर्गिक स्त्रोतांचा वापर अशा गोष्टींसाठी काम करण्याच्या उद्देश होता. कालांतराने या उद्दीष्टांमध्ये गरजेनुसार बदल करण्यात आला. यावर्षी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाबाबत # (हॅशटॅग) विथ नेचर असे ट्वीट करण्यात आले आहे. यामार्फत लोकांनी आपले पर्यावरणाप्रती असणारे प्रेम व्यक्त करावे असे आवाहनही कऱण्यात आले आहे. यामध्ये नागरीकांनी निसर्गातील आपल्या आवडत्या ठिकाणी आपला फोटो काढून तो आपल्या सोशल मिडियाच्या अकाऊंटवर अपलोड करायचा आहे. यामध्ये # विथ नेचर असेही लिहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाला जास्तीत जास्त नागरीकांनी प्रतिसाद द्यावा असे सांगण्यात आले आहे.

Story img Loader