चैत्र वैशाख महिन्यामध्ये अंगाची लाही लाही होईपर्यंत कडक ऊन असतं. या दिवसांमध्ये कलिंगड, ताडगोळे अशी अनेक फळे येतात. या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ही फळे या दिवसांमध्ये खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यातच कलिंगड हे फळ म्हणजे उन्हाळ्यात आपल्यासाठी वरदानचं आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, बी६ आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतात. त्याचं प्रमाणे अँटिऑक्सिडेंट्स आणि अमिनो असिडसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळते. साधारणपणे, बहुतेक भागांमध्ये कलिंगड २० प्रति किलोने विकले जाते, परंतु कलिंगडाची अशी एक जात आहे की, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

कलिंगडाच्या प्रजातीचे नाव डेन्सुक ब्लॅक आहे. हे टरबूज फक्त जापानच्या होक्काइडो बेटाच्या उत्तर भागात आढळतात. हे टरबूज इतके दुर्मिळ आहेत की एका वर्षात केवळ १०० फळं येतात आणि बाजारात क्वचितच मिळतात. आता तुम्ही विचार कराल की जर ते इतके दुर्मिळ कलिंगड असेल तर लोक ते कसे विकत घेतील? तर दरवर्षी या कलिंगडांचा लिलाव होतो. विकणारे याची बोली हजारो लाखांच्या घरात ठेवतात. २०१९ मध्ये सर्वात महाग विकल्या गेलेल्या कलिंगडाची किंमत ४ लाख रुपये इतकी होती. मात्र करोना काळात याची किंमत घसरली. पण आजही हे जगातील सर्वात महागडं कलिंगड आहे.

कलिंगडाचं बाह्य आवरण इतर कलिंगडासारख न्सून कुरकुरीत असते. तसेच गोड आणि कमी बिया असतात. या कलिंगडाच्या पहिल्या पिकापासून जे फळ निघते तेच इतक्या महागात विकले जाते. नंतरच्या पिकापासून मिळणारे फळ १९ हजार रुपयांपर्यंत मिळते, परंतु त्याची भारताशी तुलना केली तर ते खूप महाग आहे.

Story img Loader