जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेली इमान अहमद हिच्यावर दुबईमध्ये उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच तिने स्वत:च्या हाताने अन्न ग्रहण केले असल्याची माहिती बुरगिल रुग्णालयाने दिली आहे. अबुधाबीमध्ये आल्यापासून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ती आता बिछान्यातून उठूही शकते, असेही या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितले. इमानच्या प्रकृतीत होत असलेल्या सुधारणा पाहून तिच्या कुटुंबियांना देखील आनंद होत आहे. ‘ती लवकरच आपल्या पायावर चालू दे अशी मी देवाकडे प्रार्थना करते. तिच्या तोंडून आमची नावं ऐकण्यासाठी आमचे कान आतुर झालेत’ अशी प्रतिक्रिया तिची बहिण शायमा हिने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : कॅन्सरग्रस्त मुलाने बारावीत मिळवले ९५ % गुण

गेल्याच महिन्यात इमानला मुंबईहून दुबईमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आले. ११ फेब्रुवारी रोजी वजन कमी करण्यासाठी इमानला इजिप्तहून मुंबईत आणण्यात आले होते. तेव्हापासून एप्रिलपर्यंत तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ५०० किलो वजन असल्याने बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया करणे अवघड असल्याने तिला औषध उपचारवर ठेवण्यात आले होते. शरीरातील पाणी काढून इमानचे वजन आधी ३८० किलोपर्यंत घटवण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर इमानचे वजन २४२ किलोपर्यंत पोहोचले होते. फिजीओथेरेपी आणि औषधांमुळे इमानचे वजन १७१ किलोपर्यंत घटवण्यात डॉक्टरांना यश आले.

Viral Video : पान खाये हाथी हमारो!

मात्र एप्रिलनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं होतं. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप इमानची बहिण शायमा हिने डॉक्टरांवर केला होता. त्याचप्रमाणे इमानचे वजन घटवण्याबाबत डॉक्टरांनी जो दावा केला होता तोही खोटा असून तिचे वजन कमी झाले नसल्याचा आरोप तिच्या बहिणीने केला होता. तर दुसरीकडे शायमाला इमानला इथून घेऊनच जायचे नसल्याचे सांगत डॉक्टरांनी हा आरोप फेटाळून लावला होता. इमानच्या कुटुंबियांकडे तिच्या उपचारांसाठी पैसे नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचं सैफी रुग्णालयातल्या डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यानंतर इमानची रवानगी दुबईला करण्यात आली होती. दुबईतल्या रुग्णालयात तिच्या प्रकृती बरीच सुधारणा होत असून इमान कोणत्याही मदतीशिवाय काही काळ बिछान्यात बसू शकते असेही डॉक्टरांनी सांगितले.