तुम्ही पाण्याची पाईपलाईन किंवा तेल, पेट्रोल, गॅसच्या पाईपलाईनबद्दल ऐकले असेल पण आता जगात पहिली वहिली बिअरची पाईपलाईनदेखील टाकली गेली आहे. आता बिअरची पाईपलाईन टाकल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या असल्या तरी या देशातील जनता मात्र खूपच सूखी झाली आहे.
युरोपमधल्या बेल्जिअम देशात जगातील पहिली वहिली बिअरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ‘दी हाल्वे मान’ या बिअर उत्पादक कंपनीने ब्रुग्स गावत ही पाईपलाईन टाकली आहे. या कंपनीचा मूळ प्लान्टपासून हे गाव दूर असल्याने दिवसाला अनेकदा ट्रकला बिअरच्या बाटल्या या गावात पोहचवायला लागायच्या. ट्रकला अनेकवेळा फे-या माराव्या लागयच्या त्यामुळे हा वेळ वाचवण्याकरता कंपनीने प्लान्ट ते गाव अशी बिअरची पाईपलाईन टाकण्याचा विचार केला होता. हा विचार आता प्रत्यक्षात आला असून ही जगातील पहिली वहिली बिअर पाईपलाईन ठरली आहे.
आजपासूनच या बिअर पाईपलाईनचा वापर सुरु करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ही पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. ही पाईपलाईन जवळपास ४ किलोमीटर लांब आहे आणि जमिनीखालून ती टाकण्यात आली आहे. तासाला ४ हजार लिटर बिअर यातून वाहून नेण्यात येते. त्याप्रमाणे तासाला १२ हजार बिअरच्या बाटल्या यामुळे भरता येणे शक्य आहे. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाचा एका देशात बिअरची पाईपलाईन टाकली गेली आहे. जगातील अधिक बिअर पिणा-या देशात बेल्जिअल सहाव्या क्रमांकावर आहे आणि जवळपास वर्षाला अब्जावधीची उलाढाल येथे होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा