जगातील पहिला टेक्स्ट एसएमएस १९९२ मध्ये पाठवला होता. हा मॅसेज एका व्हिडाफोन कर्मचाऱ्यांने दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवला होता. २९ वर्षानंतर या एसएमएसचा लिलाव होत आहे. नील पापवोर्थ एक डेव्हलपर आणि इंजिनिअर म्हणून कंपनीत काम करत होते. तेव्हा एसएमएस एका कम्प्यूटरच्या माध्यमातून रिचर्ड जारविस यांना पाठवला होता. रिचर्ड जारविस तेव्हा कंपनीचे डायरेक्टर होते आणि त्यांच्या ऑर्बिटल 901 हँडसेटवर एसएमएस पाठवला होता. या १४ अक्षरांचा समावेश होता, असं व्होडाफोननं सांगितलं आहे. या मॅसेजमध्ये त्यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत Merry Christmas असं लिहीलं होतं. ३ डिसेंबर १९९२ रोजी पाठवलेल्या या टेक्स्ट मॅसेजचा लिलाव होत असून जवळपास १ कोटी ७१ लाख रुपयांची बोली लागली आहे.
एसएमएसची डिजिटल प्रतिचा लिलाव पॅरिसमधील एगट्स ऑक्सन हाउसमध्ये होत आहे. २१ डिसेंबर २०२१ पर्यंत हा लिलाव असणार आहे. त्यामुळे लिलावाची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. “१९९२ मध्ये जेव्हा एसएमएस पाठवला तेव्हा कल्पना नव्हती की, मॅसेज इतका लोकप्रिय होईल. या मॅसेजबद्दल मी आपल्या मुलांना सांगितलं होतं”, असं नील पापवोर्थ यांनी सांगितलं. “जारविस त्याला रिप्लाय देऊ शकले नाही. कारण त्यावेळी फक्त मॅसेज मिळण्याची सोय होती”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
स्कायच्या म्हणण्यानुसार, २००७ मध्ये यूके दरवर्षी ६६ अब्ज मजकूर संदेश पाठवत होते. २०१२ पर्यंत एसएमएसचं प्रमाण १५१ अब्जपर्यंत वाढले होते.