World Highest Railway Bridge Chinab Video: जगातील सर्वात उंचावरील रेल्वेचा पूल म्हणून ओळखला जाणाऱ्या ‘चिनाब रेल्वे पूलाची’ झलक भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर (एक्स) अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. अभियांत्रिकी चमत्कार मानला जाणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जम्मू आणि काश्मीरला जोडणार आहे. रियासी जिल्ह्यात चिनाब पूलाचे बांधकाम केले जात असून याच जिल्ह्यात अंजी खड हा भारतातील पहिला केबल स्टाईल पूल सुद्धा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०२४ च्या जानेवारीमध्ये पूलाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार भारतीय रेल्वे मंत्रालयाने या पूलाची झलक सुद्धा दाखवली आहे. प्राप्त माहितीनुसार चिनाब पूलाच्या दोन्ही बाजूंना झिंकने कोट केलेले आहे. या बहुचर्चित पूलावरून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईन (USBRL) लवकरच सुरु होणार असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे.

यूएसबीआरएल हा भारतीय रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १९९९ पासून चर्चेत होताच, परंतु आर्थिक अडचणी आणि भौगोलिक मर्यादांमुळे अनेकदा हे बांधकाम पुढे ढकलले गेले होते. उच्च भूकंपीय क्षेत्रांमध्ये आणि जोरदार वारा आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या प्रदेशांमध्ये स्थित, अशा या पूलाला ‘अभियांत्रिकी चमत्कार’ म्हणून ओळख मिळाली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी या पूलाविषयी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “या पूलाच्या बांधकामावेळीच भविष्यातील देखभालीचा सुद्धा पुरेपूर विचार करण्यात आला होता. हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे बांधकाम अशा प्रकारे करण्यात आले आहे की, येत्या काळात कमीतकमी देखभाल करूनही या पूलाचे संरक्षण करता येऊ शकते.”

हे ही वाचा<< मुंबईतील अटल सेतूवर ‘या’ वाहनांना नो एंट्री! २ तासांचा प्रवास २० मिनिटांत होणार, पण आधी ‘हे’ नियम पाहा

दरम्यान, सुरक्षेच्या मुद्द्यांवर, रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, चिनाब पूलाचे बांधकाम होत असलेल्या जिल्ह्य़ात यापूर्वी दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात झालेले नाहीत मात्र,नव्या प्रकल्पास सुरक्षेसाठी तरतूद करण्यात आली आहे ज्याअंतर्गत पोलीस, रेल्वे आणि सुरक्षा दल एकत्रितपणे काम करतील.