Divorce Rate Around The World : लग्न हे सर्वांत पवित्र नाते मानले जाते. पण, लग्न झाल्यानंतर काही दिवस फार आनंदात, सुखाचे जातात. त्यानंतर मात्र अनेकदा वैचारिक मतभेद सुरू होतात. अशा वेळी संसार टिकवून ठेवणे ही तारेवरची कसरत असते. या वादविवादानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. जगभरात दररोज कोट्यवधी लोक विवाहबंधनात अडकतात, तसेच अनेक लोक घटस्फोटही घेत असतात. असे केवळ भारतातच नाही, तर जगभरात घटस्फोटासंदर्भात हीच परिस्थिती आहे. पण, जगातील कोणत्या देशात घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे आणि यात भारताचा क्रमांक कितवा आहे ते जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, World of Statistics या एक्स अकाउंटवरून वर्षभरात जगभरातील कोणत्या देशात किती घटस्फोट होतात यांची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार जगात दोन विवाहामागे एक घटस्फोट होत आहे. जगातील सर्वाधिक घटस्फोट होणाऱ्या देशांच्या यादीत पोर्तुगाल पहिल्या स्थानावर आहे. पोर्तुगालमध्ये ९४ टक्के लोकांचे घटस्फोट होतात. पण, पोर्तुगालमधील ही आकडेवारी २०२० या वर्षातील आहे.

जगातील सर्वाधिक घटस्फोट घेणाऱ्या देशांमध्ये स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये २०२३ मध्ये ८५ टक्के लोकांचे लग्न मोडले. त्यामागोमाग तिसऱ्या क्रमांकावर येणारा देश आहे लक्ज्मेबर्ग. इथे ७९ टक्के घटस्फोट होतात. त्यानंतर रशिया (७३ टक्के), युक्रेन (७० टक्के), क्यूबा (५५ टक्के), फिनलँड (५५ टक्के) व बेल्जियम (५३ टक्के), अशी क्रमवारी आहे.

या आकडेवारीनुसार, नवव्या स्थानी स्वीडन देशाचे नाव आहे. स्वीडनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण ५० टक्के आहे; तर फ्रान्स यात दहाव्या स्थानी आहे. फ्रान्समध्ये ५१ टक्के घटस्फोट होतात. दरम्यान, जगातील सर्वांत शक्तिशाली देश म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेत घटस्फोटाचे प्रमाण ४५ टक्के आहे. तर, चीनमध्ये ४४ टक्के घटस्फोट होतात. यूकेमध्ये हे प्रमाण ४१ टक्के आहे.

शेवटच्या स्थानी भारत

चांगली गोष्ट म्हणजे घटस्फोटांच्या या यादीत भारत शेवटच्या स्थानी आहे. भारताआधी व्हिएतमानचे नाव घेतले जाते. व्हिएतनाममध्ये घटस्फोटाचे हे प्रमाण सात टक्के आहे; तर भारतात हेच प्रमाण केवळ एक टक्का आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World of statistics shares average divorce rate around the world which country has the highest number of divorces india which number find out sjr