World’s Oldest Person: जगभरातील विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या पुस्तकामध्ये अनेक विक्रमांची नोंद होत असते. जास्तीत जास्त नारळ फोडणे, सर्वाधिक दात असणे, पाण्याखाली जादू दाखवणे, जास्तीत जास्त बर्गर खाणे आदी अनेक विक्रम यात नोंदविण्यात आले आहेत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने २०२२ मध्ये एका व्यक्तीला ‘जगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती’ (World’s Oldest Person) म्हणून घोषित केले होते. तर, २ एप्रिल रोजी या वृद्ध व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगातील सर्वांत वृद्ध व्यक्तीचे नाव जुआन व्हिन्सेंट पेरेझ, असे आहे. जुआन हे व्हेनेझुएलाचे रहिवासी होते. त्यांनी वयाच्या ११४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २०२२ मध्ये जेव्हा त्यांना ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’चा ‘जगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती’ हा किताब देण्यात आला तेव्हा त्यांचे वय ११२ होते. आज व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर जुआन यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी शेअर केलेली पोस्ट एकदा पाहा.

हेही वाचा…अन्न-पाण्याच्या शोधात हत्तीची मानवी वस्तीकडे धाव, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता

पोस्ट नक्की बघा…

जुआन यांचा कुटुंबाबरोबरील एक फोटो या पोस्टमध्ये शेअर करून लिहिले, ‘आमचे प्रिय जुआन व्हिन्सेंट पेरेझ मोरा, आम्ही तुम्हाला खूप दुःख आणि वेदनांनी निरोप देतो आहे; जे नेहमी आदर्श, नम्र, कष्टाळू, शांत व उत्साही होते’, अशी हृदयस्पर्शी कॅप्शन त्यांनी फोटोला दिली आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्या वृत्तानुसार जुआन यांचा जन्म २७ मे १९०९ रोजी झाला. त्यांचे एडिओफिना गार्सिया नावाच्या महिलेशी लग्न केले. त्यांना ११ मुले म्हणजेच सहा मुलगे आणि पाच मुली; तसेच ४१ नातवंडे आणि १८ पणतू आहेत. त्यांच्या पत्नीचे १९९७ मध्ये निधन झाले. जुआन हे मेहनती शेतकरी होते. पण, ते वेळेवर विश्रांती घेऊन, दररोज उसापासून बनविलेल्या मद्याचे सेवनही करायचे. २०२२ मध्ये जेव्हा त्यांना सर्वांत वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हा त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता आणि त्यांनी कधीही विशेष औषधेसुद्धा घेतली नाहीत.