अमेरिकेत अवकाशातून होणाऱ्या विजेच्या कडकडाटनं नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात लांब वीज पडल्याची नोंद करण्यात आली आहे. हे अंतर सुमारे ७७० किमीचं होतं. म्हणजेच लंडनपासून जर्मनीच्या हॅम्बर्गपर्यंत किंवा न्यूयॉर्क ते कोलंबस ओहिओ इतकं असेल. अमेरिकेच्या हवामान खात्याचं म्हणणं आहे की, यापूर्वी २९ एप्रिल २०२० रोजी मिसिसिपी, लुईझियाना आणि टेक्सासमध्ये वीज ७६८ किलोमीटरपर्यंत कडाडली होती. तेव्हाही एक नवा विक्रमही झाला होता.

सर्वात जास्त विजेचा कडकडाट झाल्याचं जागतिक हवामान खात्यानं सांगितलं आहे. मात्र किती वेळ चमकत होती, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी १८ जून २०२० मध्ये उरुग्वे आणि उत्तर अर्जेंटीनात १७.१ सेकंद वीज पडली होती. त्यानंतर ४ मार्च २०१९ या दिवशी उत्तर अर्जेंटीनात ०.३७ सेकंद वीज चमकली होती. जागतिक हवामान संघटनेचे (हवामान तज्ज्ञ रँडल सेर्व्हनी यांनी सांगितले की, हा विक्रम एका विजेच्या चमकण्याचा आहे. विजेच्या लखलखाटाची लांबी आणि ती किती काळ टिकते, ही प्रक्रिया गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाली आहे. डब्ल्यूएमओचे प्रमुख पेटेरी तालास यांनी सांगितले की, वीज पडणे हा एक मोठा धोका आहे ज्यामुळे दरवर्षी अनेक लोकांचा बळी जातो. विजेचा कडकडाट होणे आणि पडणे ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. डब्ल्यूएमओने म्हटले आहे की विजेपासून सुरक्षित असलेली एकमेव ठिकाणे म्हणजे मोठ्या इमारती ज्यामध्ये वायरिंग आणि प्लंबिंगद्वारे सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.

वीज कशी तयार होते?

पावसाळ्याच्या सुरूवातीला उन्हाळ्यात जमिनीजवळची तापलेली गरम हवा आकाशात वर वर जाते. या हवेत काही धुळीचे कणही असतात. हवा जशी जास्त वर जाते तशी ती वरच्या थंड वातावरणामुळे गार-गार होत जाते. तिचे नंतर छोटय़ा छोटय़ा बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते. हे लहान लहान बर्फाचे कण एकमेकांवर आपटतात व वरतीच तरंगत रहातात. हे कण एकमेकांवर घासले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स (Electric Charge differance) तयार होतो. अधिक घनभार (Positive Charge) हा ढगांच्या वरच्या बाजूला ओढला जातो किंवा तयार होतो व ऋणभार (Negative Charge) हा ढगांच्या खालच्या बाजूला स्थिरावतो किंवा खालच्या बाजूला तयार होतो. जसे जसे हे घनभारित व ऋण भारित ढग जमिनीवरून वाहू लागतात, तसे तसे जमीन व त्यावरील झाडे व उंच इमारती यांच्यात घनभार (Positive Charge) तयार होतो. हा भारांचा फरक (Differance Between the charges) वाढत जातो, तसा तसा ढग व जमीन यांच्यामध्ये विद्युत प्रवाह वाहू लागतो. (Electrical current begins to move) विद्युत प्रवाह (Electrical current) हा वाहण्यासाठी नेहमी जवळचा मार्ग शोधतो जेव्हा तो आपला मार्ग पूर्ण करतो. (When it completes the circuit it releases the Energy in the form of light) तेव्हा ही एनर्जी प्रकाशाच्या रुपात मुक्त होते व आपल्याला वीज कडाडताना दिसते. विजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो, कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे विजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो.