World Richest Begger: भिकारी हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर एखादा मळलेल्या कपड्यातला, विखुरलेल्या केसाचा, घाणेरडी नखं आणि अस्वच्छ अवतारतला माणूस डोळ्यासमोर येतो. असं रुपडं पाहून एकीकडे मनात त्यांच्याविषयी अनेकांना वाईटही वाटतं, ही लोकं कधीतरी यातून बाहेर येऊ शकतील का? कधीतरी निदान मध्यमवर्गीयांसारखं जगता येईल का? असे प्रश्न कधी ना कधी तुमच्याही मनात आलेच असतील. हो ना? पण आता जर आम्ही तुम्हाला सांगितलं की गरजेच्या पलीकडे जाऊन भीक मागणे हे एक प्रोफेशन झाले आहे तर.. आज आपण जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याची जीवन कहाणी जाणून घेणार आहोत.
जगातील सर्वात श्रीमंत भिकारी ‘भरत जैन’ कोण आहे?
जगातील सर्वात श्रीमंत भिकारी भरत जैन मुंबईच्या अनेक रस्त्यांवर भीक मागतो. गरिबीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही. जगातील सर्वात श्रीमंत भिकारी भारत जैन विवाहित असून त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि त्याचे वडील आहेत. त्यांच्या दोन मुलांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. तो मूळचा मुंबईचा असून त्याची एकूण संपत्ती ७.५ कोटी रुपये ($१ दशलक्ष) आहे. तो भीक मागून महिन्याला ६०,०००- ७५,००० रुपये कमावतो आणि त्याच्याकडे मुंबईत १.२ कोटी रुपयांचा दोन बेडरूमचा फ्लॅट आहे आणि ठाण्यात दोन दुकाने आहेत ज्यांचे भाडे ३०,००० रुपये आहे. भरत जैन हे छत्रपती शिवाजी टर्मिनस व आझाद मैदान परिसरात भीक मागतात.
आता तुम्ही म्हणाल की एवढं श्रीमंत होऊनही भरत जैन भीक का मागत असतील? तर मुंबईत काम करणाऱ्या अनेकांना १२-१४ तास काम करूनही दिवसाला हजार रुपये मिळवता येत नाहीत पण याच मेहेरबान लोकांच्या दिलदार स्वभावामुळे भरत जैन हे १० ते १२ तासांत दररोज २०००-२५०० रुपये जमा करतात.
हे ही वाचा<< मुंबईत पावसाळा जोरात पण जगात सर्वात उच्च तापमानाची नोंद; ३ जुलैला नेमकं घडलं काय?
भरत जैन आणि त्यांचे कुटुंब परळमधील १ BHK डुप्लेक्स निवासस्थानात राहतात. त्यांची मुलं कॉन्व्हेंट शाळेत जातात. कुटुंबातील इतर लोक स्टेशनरीचे दुकान चालवतात. ते वारंवार भरतला भीक न मागण्याचा सल्ला देतात, पण भरत ऐकत नाहीत व भीक मागण्याचे काम करतात. विशेष म्हणजे भरत यांची कहाणी व्हायरल होऊनही अनेकज त्यांना ओळखत नाहीत व भीक देतात.