World Sleep Day 2023: दिवसभर थकल्यानंतर प्रत्येकालाच रात्रीची शांत झोप ही हवी असते. निरोगी राहण्यासाठी चांगली झोप ही आवश्यक आहे. परंतु आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण झोपेशी संबंधित समस्यांना बळी पडत आहेत. त्यातीलच एक समस्या म्हणजे घोरणे. जगात नेमके किती लोक झोपल्यावर घोरतात, हे ठामपणे कोणीच सांगू शकणार नाही. पण झोपेत घोरणाऱ्यांची संख्या वाढतेय. जागतिक निद्रा दिनानिमित्त सेन्चुरी मॅट्रेसेसने केलेल्या सर्वेक्षणातून ७० टक्के जोडप्यांना जोडीदाराच्या घोरण्याचा त्रास होत असल्याची बाब समोर आली आहे. तर अनेकदा तर या घोरण्यामुळेच लग्नंही मोडलेली आहेत. या सर्वेक्षणातून निदर्शनास आलेली आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे ३२ टक्के विवाहित जोडप्यांना वाटते की, त्यांच्या जोडीदाराचे घोरणे हे मोटरसायकलच्या आवाजासारखे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण का घोरतो?

आपण जेव्हा झोपेत श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपली मान आणि डोक्यामधल्या मुलायम टिश्यूंमध्ये कंपनं येतात आणि परिणामी घोरण्याचा आवाज येतो. आपल्या नाकाद्वारे पुढे जाणाऱ्या भागात, टॉन्सिल आणि तोंडाच्या वरच्या भागात हे सॉफ्ट टिश्यू असतात.

घोरण्यामागे प्रामुख्याने ही आहेत कारणे –

  • अनियंत्रित वाढलेले वजन
  • अतिधूम्रपान
  • आनुवांशिकता
  • महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक दिसते.
  • साठी उलटून गेल्यानंतर निद्राश्वसनरोध होण्याची शक्यता अधिक असते

मग हे घोरणं थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो?

  • श्वसन मार्ग खुला ठेवला तर घोरणं थांबवलं जाऊ शकतं. यासाठी अनेक पद्धती आहेत.
  • कुशीवर झोपा
  • तुमचं नाक स्वच्छ ठेवा
  • नाकाला लावायच्या पट्ट्या
  • वजन कमी करा
  • दारूपासून दूर रहा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World sleep day 2023 70 indians are bothered by their partners snoring srk