World Space Week 4-10 October : दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान जगभरात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’ साजरा केला जातो. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. जागतिक अंतराळ सप्ताह हा जगातील सर्वांत मोठा वार्षिक अवकाश कार्यक्रम आहे. ६ डिसेंबर १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने ‘जागतिक अंतराळ सप्ताह’ची घोषणा केली होती. संस्थेकडून या सप्ताहासाठी दरवर्षी एक विषय जाहीर केला जातो. या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जागतिक अंतराळ सप्ताहाचे महत्त्व

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

लोकांना अंतराळातील नवनवीन गोष्टी आणि अंतराळाशी संबंधित माहिती मिळवून देण्यासाठी मदत करणे हे जागतिक अंतराळ सप्ताहाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना अंतराळातून कोणते फायदे मिळू शकतात आणि ते शाश्वत आर्थिक विकासासाठी अंतराळाचा कसा वापर करू शकतात हे समजण्यास मदत होते.

हेही वाचा- रस्त्याच्या मधोमध पांढर्‍या अन् पिवळ्या रेषा का आखल्या जातात? तुटक रेषांचा नेमका अर्थ काय? अनेकांना माहिती नाही ‘हे’ कारण 

जागतिक अंतराळ सप्ताह २०२३ साठी थीम

दरवर्षी जागतिक अंतराळ सप्ताहासाठी वेगवेगळी थीम निवडली जाते. त्यानुसार यंदाच्या म्हणजे २०२३ च्या जागतिक अंतराळ सप्ताहाची थीम ‘अंतराळ आणि उद्योजकता’ अशी आहे.

जागतिक अंतराळ सप्ताह २०२३ जगभरातील विद्यार्थ्यांना STEM आणि व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित करील आणि स्पेस कंपन्यांना व्यावसायिक अवकाश उद्योगाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या कामगारांची भरती करण्याची संधी दिली जाईल.

जागतिक अंतराळ सप्ताहाचा इतिहास

६ डिसेंबर १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक अंतराळ सप्ताहाची घोषणा केली. अंतराळ युगाच्या सुरुवातीपासूनच संयुक्त राष्ट्रांनी हे ओळखले की, बाह्य अवकाशाने मानवतेच्या अस्तित्वाला एक नवीन आयाम जोडला आहे. यूएन जनरल असेंब्ली (UNGA)ने बाह्य अवकाशाशी संबंधित आपला पहिला ठराव ‘बाह्य अवकाशाच्या शांततापूर्ण वापराचा प्रश्न’ नावाने स्वीकारला होता. तसेच संयुक्त राष्ट्रांनी अंतराळ ही कोण्या एका देशाची मालकी नसून, त्यावर सगळ्या मानवजातीचा समान अधिकार आहे आणि अंतराळाचा उपयोग युद्धासाठी न करता, मानवजातीच्या कल्याणासाठी करावा, असे मार्गदर्शक तत्त्व घालून देण्यात आले.

भारताचे अंतराळातील यश

  • २३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर यशस्वीरीत्या उतरणारा चौथा देश बनून इतिहास रचला. चांद्रयान-३ मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केले.
  • २ सप्टेंबर रोजी भारताने आदित्य-L1 मिशन लाँच केले. सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली अंतराळावर आधारित भारतीय मोहीम आहे.

चांद्रयान-३ आणि आदित्य-एल१ च्या आधी भारतीय अंतराळ संस्थेने इतर टप्पेही पूर्ण केले आहेत ते पुढीलप्रमाणे :

  • भारताने १९ एप्रिल १९७५ रोजी आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केला.
  • १८ जुलै १९८० रोजी भारताने RS-१ या प्रायोगिक स्पिन-स्थिर उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

तसेच भारताने इतर अनेक देशांना त्यांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी मदत केली आहे.