अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दररोज चर्चेत असतात. कधी स्वत: केलेल्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्यावर विरोधाकांनी केलेल्या आरोपामुळे. दररोज चर्चेत असणारे डोनाल्ड ट्रम्प आज वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे टॉलेट ब्रश बाजारात आल्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. १९ नोव्हेंबर हा वर्ल्ड टॉयलेट डे म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्तान एका व्यक्तीने डोनाल्ड ट्रम्प टायलेट ब्रश बाजारात आणला आहे. फोटोसह ऑनलाईन विक्रीसाठी आलेला आणि हातोहात खपलेला ट्रम्प टॉयलेट ब्रशमुळे ते चर्चेत आहे.
न्यूझीलंडमधील एका व्यक्तीने संडास धुवायचा हा ब्रश हाताने तयार केला आहे. तो अतिशय मजेदार आहे. या ब्रशवर ट्रम्प यांचा चेहरा, निळा सूट आणि लाल टायसह असून केसाची स्टाईल थोडी बदलली गेली आहे. या ब्रशची किंमत २३.५० डॉलर्स म्हणजे १७०० रुपयांच्या आसपास आहे. या ब्रशला ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत १५ नोव्हेंबर पर्यंत होती. विशेष म्हणजे ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तो विक्रीसाठी खुला केला गेला तेव्हा लोकांनी त्याची जोरदार खरेदी केली. या माणसाने बनविलेले सर्व ब्रश सुरवातीलाच विकले गेले आहेत.