World Vada Pav Day 2023 : महाराष्ट्रात प्रत्येकाचा आवडता पदार्थांपैकी एक म्हणजे वडापाव! नुसतं नावं काढलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. आज जागतिक वडापाव दिवस आहे. दरवर्षी २३ ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो. द इंडियन बर्गर म्हणून वडापावला जगभरात ओळखले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वडापावचा शोध कोणी लावला?
मुंबईच्या अशोक वैद्य यांना वडापावचा शोध लावण्याचे श्रेय दिले जाते. १९६६ मध्ये त्यांनी दादर रेल्वे स्टेशन जवळ पहिले वडापावचा स्टॉल सुरू केला होता. स्वस्त आणि पटकन तयार होणारा वडापाव परळ आणि वरळी येथील कापड गिरण्यांकडे रोड ये-जा करणाऱ्या कामगारांमुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरला. कामगार वर्गाचा नाश्ता म्हणून वडापाव प्रसिद्ध होता मात्र १९७० आणि १९८० च्या दशकात सर्वसामन्यांचा आवडता पदार्थ म्हणून त्याची लोकप्रियता वाढली.आजही सर्वसामान्यांचे पोट भरण्यासाठी वडापाव महत्त्वाचे योगदान देत आहे. १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत वडापावची किंमत आहे.
आज जागतिक वडापाव दिनानिमित्त आज आपण पुण्यातील प्रसिद्ध वडापावबाबत जाणून घेणार आहोत.
पुण्यातील प्रसिद्ध प्रसिद्ध वडापाव
१. जोशी वडेवाले – बालगंधर्व रंगमंदीर समोर
पुण्यात गेल्या ३४ वर्षांपासून प्रसिद्ध असलेला वडापावपैकी एक म्हणजे जोशी वडापाव. २ ऑक्टोबर १९८९ रोजी पुण्यात बालगंधर्वसमोर जोशी वडेवाले यांचे पहिले दुकान सुरु झाले होते. शैलेश जोशी यांनी त्यांची पत्नी वसुंधरा यांच्यासह स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. झणझणीत आणि गरमा गरम वडापावसाठी गेल्या ३४ वर्षांपासून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण पुणेकरांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक झाले आहे. आजच्या घडीला जोशी वडेवालेंच्या पुण्यात अनेक शाखा सुरु आहेत.
हेही वाचा – World Vadapav Day: जाणून घ्या वडापावच्या जन्मापासून लंडनपर्यंत मजल मारण्याची कहाणी
२. गार्डन वडपाव – जे जे गार्डन, बट्टी स्ट्रीट, कॅम्प
प्रत्येक पुणेकराचे आवडते वडापावचे ठिकाण म्हणजे गार्डन वडापाव. गार्डन वडापावचे मालक नंदू नायक यांच्या आई-वडीलांनी १९७२ साली कॅम्पमध्ये गार्डन भागात हा वडापाव व्यवसाय सुरु केला. उत्तम चवीसाठी गेल्या ५१ वर्षांपासून प्रसिद्ध असलेला हा गार्डन वडापाव पुणेकरांचा लाडका वडापाव म्हणून ओळखला जातो या वडापावसाठी आजही लोकांची रांग लागते. गार्डन वडापावच्या देखील पुण्यात अनेक शाखा सुरू आहेत.
३. खत्री बंधू वडेवाले – बालगंधर्व रंगमंदीरजवळ
पुण्यातील प्रसिद्ध वडापावच्या यादीमध्ये गेल्या ४७ वर्षांपासून प्रसिध्द असलेला खत्री बंधू वडेवाले देखील येतात. बालगंधर्व रंगमंदीर जवळील छोट्या गाडीवर सुरु असलेल्या खत्री बंधूं वडेवाले येथील वडापाव खाण्यासाठी पुणेकरांची भरपूर गर्दी होते.
४. प्रभा विश्रांतीगृह- केसरी वाड्यासमोर
पुणेकरांचे हक्काचे नाश्ता आणि जेवणाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे प्रभा विश्रांती गृह. येथील साबुदाना वडा आणि बडाटा वडा प्रसिद्ध आहे. कै.सरस्वतीबाई परांजपे यांनी १९४० मध्ये हॉटेल व्यवसाय सुरू केला. गेल्या ८३ वर्षांपासून सुर असलेल्या प्रभा विश्रांतीगृहमध्ये वडा खाण्यासाठी आजही खव्वयांची येथे गर्दी होते.
५. नित्यानंद डोसा सेंटर, तुळशीबाग, बँक ऑफ महाराष्ट्रसमोर
पुणेकरांच्या लाडक्या वडापावच्या ठिकाणांपैकी एक म्हणजे तुळशीबागेतील वडापाव. गेल्या ३६ वर्षापासून नित्यानंद डोसा सेंटर येथे मिळणारा वडापाव आजही पुणेकर आवडीने खातात. संध्याकाळी ५ नंतर यांचा वडापाव विक्री सुरू होते आणि अवघ्या २-४ तासात त्यांच्याकडील सर्व वडापाव संपतात.
पुण्यात वडापावसाठी प्रसिद्ध असलेली इतर अनेक ठिकाणे आहेत
१. निगोजकरवाडा – नारायण पेठ
२ एस. कुमार वडेवाले- साधना शाळेसमोर, हडपसर
३. अन्नपूर्णा स्न्रक्स सेंटर -तपकिर गल्ली बुधवार पेठ
४. श्रीकृष्ण वडापाव – सुवर्ण गंगा अपार्टमेंट, नारायण पेठ, बुधवार पेठ
५. कर्जत वडापाव – कसबा गणपतीजवळ, फडके हाऊस चौक, कसबा पेठ
६. शिवतीर्थ तंदुर वडपाव – शिव तीर्थनगर, पौड रस्ता
हेही वाचा – World Vada Pav Day 2023: मुंबईतील ‘हे’ प्रसिद्ध वडापाव तुम्ही खाल्ले आहेत का?
पुणेकरांनो, वाट कसली पाहातय? या प्रसिद्ध ठिकाणी भेट द्या आणि वडापावचा आस्वाद घेऊन, जागतिक वडापाव दिवस साजरा करा.