World Biggest Eggplant Pics : जग खूप विचित्र आहे. इथे कधी आणि काय बघायला आणि ऐकायला मिळेल हे सांगता येत नाही. काही वेळा तर अशा काही विचित्र गोष्टी पाहायला मिळतात की, त्या आपण कधी आयुष्यात पाहिल्या नसतात आणि त्या पहिल्यांदा पाहिल्यानंतर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. अनेकदा अशा गोष्टींची वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होते. त्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये दररोज अनेक मनोरंजक रेकॉर्ड्सची नोंद होत असते. त्यात अलीकडे अशाच एका नव्या रेकॉर्ड्सची नोंद झाली; जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. पण, यावेळी कोणा एका व्यक्तीने हा रेकॉर्ड केलेला नाही, तर एका भाजीने रेकॉर्ड केला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की, कोणती भाजी कसा काय रेकॉर्ड करू शकते; पण हो, वांग्याच्या भाजीच्या नावे एका नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक वांग्याचे वजन तब्बल ३.७७ किलो

आपण आतापर्यंत लहान लहान वांगी पाहिली आहेत. पण, अलीकडेच एका व्यक्तीने आपल्या शेतातील चक्क भोपळ्याच्या आकाराचे वांगे विकले; जे पाहून लोकांना धक्काच बसला. बहुतेक वांगी १५०-२०० ग्रॅमची असतात आणि कधी कधी ती अगदी लहान असतात; पण या व्यक्तीने तब्बल तीन किलोपेक्षा जास्त वजनाचे वांगे पिकवले. भोपळ्याच्या आकाराचे वांगे पिकवणाऱ्या या व्यक्तीचे नाव डेव्ह बेनेट आहे; ज्याने २००- ४०० ग्रॅम नव्हे, तर ३.७७ किलो वजनाचे वांगे पिकविले आहे. या वांग्याचे वजन इतके आहे की, त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे.

जगातील सर्वांत मोठे वांगे

या भोपळ्याच्या आकाराच्या वांग्याचे वजन सामान्य वांग्यापेक्षा सुमारे १० पट जास्त आहे. अमेरिकेत राहणाऱ्या डेव्हने एप्रिलमध्ये हे वांगे पिकवले ​​होते. ही माहिती रेकॉर्ड कीपरवरदेखील दिली आहे. तसेच एक निवेदन प्रसिद्ध केले; ज्यात म्हटले आहे की, एप्रिलच्या सुरुवातीला डेव्ह बेनेट (यूएसए) यांनी या वांग्याची लागवड केली होती. रेकॉर्ड-सेटिंग ग्लोब एग्प्लान्ट (उर्फ अमेरिकन वांगे) त्याच्या गोलाकार फळासाठी ओळखले जाते. ब्लूमफिल्ड, आयोवा येथे पिकवलेले हे वांगे ३१ जुलै रोजी काढण्यात आले.

युजर्स झाले थक्क

@guinnessworldrecords च्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवर या वांग्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये लिहिले आहे की, डेव्ह बेनेटने लागवड केलेले सर्वांत वजनदार वांगे वजन ५.७७८ किलो (८ पौंड ५.३ औंस) आहे.

या वांग्याचा फोटो पाहून एका युजरने लिहिले आहे की, हा खरोखरच एक रेकॉर्ड आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे की, या रेकॉर्डला विलक्षण म्हणतात. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, असेही होऊ शकते का?