पाण्यावर तरंगणा-या एखाद्या फ्लोटिंग हॉटेलमध्ये राहणे म्हणजे खिशाला मोठी कात्री लावण्यासारखेच आहे कारण जगाच्या पाठिवर असणा-या अशा फ्लोटिंग हॉटेलमध्ये राहण्यासाठी ग्राहकाला चांगलीच किंमत मोजावी लागते. आपल्याकडे केरळ राज्यात होड्यांवर बांधण्यात आलेले असे फ्लोटिंग बोट हाऊस पर्यटकांचा आकर्षणाचा विषय आहे. पण या सेवेचा लाभ घेण्यासाठी पैसेही जास्त मोजावे लागतात हे मात्र नक्की. पण सध्या सोशल मीडियावर फ्लोटिंग हॉटेलची चर्चा जास्त आहे. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी ग्राहकाला फक्त आणि फक्त २६ रुपये खर्च करावे लागतात. तुम्हालाही आर्श्चयाचा धक्का बसला ना !
बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये ‘फरीदपूर’ हे होड्यांवर बांधण्यात आलेले जगातील सगळ्यात स्वस्त हॉटेल आहे. पण यामागचे सत्य असे आहे की येथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा ग्राहकांना देण्यात येत नाही इतकेच नाही तर एक पलंग १७ माणसांसोबत वाटूनही घ्यावा लागतो, त्यामुळेच या हॉटेलचे भाडे खूप कमी आहे. गेल्या ६० वर्षांपासून हे हॉटेल सुरु आहे. गंमतीचा भाग म्हणजे या फ्लोटिंग हॉटेलमधला सगळ्यात महागड्या खोलीचे भाडे हे फक्त १०२ रुपये इतकचे आहे. या हॉटेलमध्ये खाण्या पिण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने ग्राहकांना जेवण्यासाठी बाहेर जावे लागते. या हॉटेलचे भाडे अत्यंत कमी असल्यामुळे हे हॉटेल नेहमीच भरलेले असते पण कोणत्याही ग्राहकाला तीन महिन्यांहून अधिक काळ येथे राहता येत नाही.
viral : या हॉटेलचे भाडे फक्त २६ रुपये !
तर हॉटेलमधल्या महागड्या खोलीचे भाडे फक्त १०२ रुपये
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 17-10-2016 at 18:25 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds cheapest floating hotel in bangladesh costs just 26 rupees