एका नंबरप्लेटसाठी कोणी १३२ कोटी मोजल्याचं ऐकलंय का? एवढ्या किंमतीत नंबरप्लेटसहित कित्येक आलिशान गाड्या विकत घेता येतील नाही का? पण ब्रिटनमधल्या अफझल खान नावाच्या व्यक्तीनं आपल्या आलिशान गाडीवरील नंबरप्लेट चक्क १३२ कोटी रुपयांना विक्रीसाठी ठेवली आहे. या प्लेटची मूळ किंमत जवळपास ११० कोटी आहे त्यावर कर असल्यानं एकूण १३२ कोटी रुपये मोजून संग्राहकाला ती विकत घेता येणार आहे. पिवळ्या रंगाच्या पट्टीवर ‘F1’ असं लिहिलेल्या या प्लेटची जर विक्री झालीच तर जगातील सर्वाधिक किंमतीत विकली गेलेली ही नंबरप्लेट ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : अंतराळातल्या पहिल्या वहिल्या आलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च माहितीये?

‘फॉर्म्युला १’ लिहिलेली ही कारची नंबरप्लेट काही वर्षांपूर्वी अफझल यांनी १०. ५२ कोटींना विकत घेतली होती. त्यांच्या आलिशान बुगाटी कारवर ही नेमप्लेट होती. युकेमधील अनेकांकडे अशा काही परवाना असलेल्या नंबरप्लेट्स आहेत ज्या ते लिलावात विकू शकतात. त्यानं UK’s Regtransfers मार्फत ही नंबरप्लेट विक्रीसाठी ठेवली आहे. ही युकेमधील सर्वात मोठी आणि अधिकृत नंबरप्लेट्सची विक्री करणारी वेबसाईट आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आलिशान गाड्यांच्या नंबरप्लेट्स इथून विकत घेतल्या आहेत.

वाचा : ….तर ते ७० भटके कुत्रे कोट्यधीश होतील

याआधी सोन्याच्या किंवा हिरेजडीत नंबरप्लेटवर कोट्यवधीची बोली लागली होती. पण १३२ कोटींची किंमत असलेली ही कदाचित पहिलीच नंबर प्लेट असेल. जर एखाद्यानं ही नंबरप्लेट विकत घेतली तर सर्वाधिक किंमतीत विकली गेलेली ही पहिली नंबर प्लेट असेल.