आपल्या सर्वांना माहित आहे की, केळ हे सर्वात पौष्टिक फळांपैकी एक आहे. केळीचा आस्वाद घेण्याचे अनेक मार्ग आहेत. केक, मफिन्स, आइस्क्रीम, पॅनकेक्स किंवा स्मूदीच्या स्वरूपात असो, आपल्या सर्वांना केळीचा आस्वाद घेणे आवडते. हे फळ पोटॅशियमने समृद्ध आहे आणि पचनासाठी उत्तम आहे, म्हणूनच आपण आपल्या दैनंदिन आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे. आता, आम्ही तुम्हाला केळीच्या प्रजातींपैकी एक मनोरंजक सत्याची ओळख करून देणार आहोत? अलीकडेच, ट्विटरवर अद्वितीय एका भल्या मोठ्या केळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही आजपर्यंत एवढं मोठे केळ कधीही पाहिलं नसेल. चला जाणून घेऊ या सविस्तर
जगातील सर्वात मोठं केळीची प्रजाती
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “इंडोनेशियाजवळील पापुआ न्यू गिनी बेटांवर सर्वात मोठा आकाराची केळे उत्पादन घेतले जाते. केळीचे झाड नारळाच्या झाडाच्या उंचीचे असते आणि फळे मोठ्या प्रमाणात लागतात. प्रत्येक केळीचे वजन सुमारे ३ किलो असते” आता ३ किलो हे नवजात बाळाच्या वजनाच्या जवळपास आहे. फळ पिकण्यास सुमारे पाच वर्षे लागतात आणि त्यामुळे ते फार मोठ्या प्रमाणावर पिकत नाही.
तुम्ही कधीही पाहिलं नसेल एवढं मोठं केळ
ही केळीच्या वनस्पतीची सर्वात मोठी प्रजाती १५ मीटर (१५०० सें.मी.) लांबीपर्यंत वाढणारी प्रत्येक फळासह ३०० फळांचा गुच्छ तयार करु शकते? होय. महाकाय आकाराच्या केळीचा गुच्छ ६० किलोग्रॅमपर्यंत वजनाचा असू शकतो!
हेही वाचा: चक्क हवेत तरंगतोय दगड? व्हायरल फोटोमागील वास्तव समजल्यावर तुम्हीही व्हाल थक्क
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाली नोंद
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने केळीच्या वनस्पतीची सर्वात मोठी प्रजाती म्हणून ‘मुसा इंजेन्स’ हे मूळचे न्यू गिनी असल्याची पुष्टी केली आहे. GWR अहवालात असे म्हटले आहे की, वनस्पतीचे मुख्य खोड साधारणपणे १५ मीटर पर्यंत उंच वाढते आणि पाने जमिनीपासून २० मीटर उंच फडफडतात. “त्याचे केळीचे घड, १५-मीटर-लांब (४९ फूट) देठ वर वाढतात, सुमारे ५०० फळे धरू शकतात ज्यांचे एकूण वजन ६० किलोग्राम (132 पौंड) असते. वैयक्तिक आयताकृती आकाराची फळे सुमारे १८ सेंटीमीटर (७ इंच) लांब असतात आणि शिजवल्यावर खाण्यायोग्य असतात, केळ्यांसारखीच चव आणि पोत असते, ” असे अहवाल स्पष्ट केले आहे.
सोशल मिडियावर चर्चेत आहे व्हिडिओ
शेअर केल्यापासून, व्हिडिओला आतापर्यंत ४१.१ लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे आणि ६८४ लाईक्स मिळाले आहेत. एका युजरने लिहिले, ‘हवामानाचे संकट खरे आहे. मागच्या वेळी मी पापुआ न्यू गिनीला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला सर्व मार्गांनी प्रवास केला होता.’
दुसऱ्याने लिहिले की, ‘अर्थव्यवस्थेच्या आकाराची केळी! व्वा.”
काही प्रश्न कमेंट विभागांमध्ये देखील दिसले.
हेही वाचा: “हेल्मेट का नाही घातलं?” पोलिसांनी विचारताच तरुण गाऊ लागला गाणं, Video पाहिल्यानंतर पोट धरून हसाल
“हे बारमाही आहे की प्रत्येक पिकानंतर कापणी केली जाते? “ते कापणीसाठी वर कसे चढतात?”
एका वापरकर्त्याने सांगितले, “एक केळ पूर्ण दिवस पुरेस आहे.”तर “हे जाणून छान वाटले, धन्यवाद,” असे आणखी एकाने सांगितले.
या केळीबद्दल तुम्हाला काय वाटते? खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये तुमचे विचार आमच्यासोबत शेअर करा.