भारतीय मुलगा रिफत शहारूख याने तयार केलेल्या जगातील सगळ्यात हलक्या अशा उपग्रहाचे प्रक्षेपण नासा या महिन्यात करणार आहे. मुळचा चेन्नईचा रहिवासी असलेल्या १८ वर्षांच्या रिफतने ‘कलामसॅट’ नावाचा उपग्रह तयार केला. नासा आणि ‘आय डुडल लर्निंग’ने आयोजित केलेल्या ‘क्युब इन स्पेस’ या स्पर्धेत शाहरुख सहभागी झाला होता आणि या स्पर्धेसाठी त्याने ठोकळ्याचा आकाराचा उपग्रह तयार केला होता, हा उपग्रह २१ जूनला नासाकडून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जानेवारी महिन्यात रिफतने आपला महत्त्वकांक्षी प्रकल्प नासाकडे सुपूर्त केला. जगातील अनेक उपग्रहांवर अभ्यास करण्यात आल्यावर रिफतने बनवलेला उपग्रह सर्वात हलका आणि लहान असल्याचे नासाने म्हटले आहे, तेव्हा हा उपग्रह जूनमध्ये प्रक्षेपित करणार असल्याची माहिती नासाने गेल्याच महिन्यात दिली होती. भारतीय विद्यार्थ्याने एका स्पर्धेत बनवलेला उपग्रह पहिल्यांदाच नासा प्रक्षेपित करणार आहे, ही दुसरी अभिमानाची बाब आहे. २४० मिनिटांची ही प्रक्षेपण मोहिम असून तो १२ मिनिटे अंतराळाच्या कक्षेत ‘कलामसॅट’ भ्रमण करणार आहे.

शाळेत असतानाच रिफतमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली होती. रिफतचे वडील स्वत: वैज्ञानिक होते तेव्हा हे बाळकडू त्याला वडिलांकडून मिळाले. ‘लहानपणी वडिलांना सतत प्रयोगशाळेत काम करताना मी पाहायचो. त्यांच्यासारखं वैज्ञानिक बनवण्याचं माझं स्वप्न होतं. आज ते स्वप्न पूर्ण झालं’ असंही रिफतही म्हणाला. रिफतचे वडिल तो लहान असतानाच वारले. सातवीत असताना त्याने शाळेच्या प्रकल्पासाठी इनर्व्हटर बनवला होता. त्यानंतर ‘क्युब इन स्पेस’ स्पर्धेसाठी ठोकळ्याच्या आकाराचा उपग्रह तयार केला, यासाठी भारतातल्या विविध भागातून आलेल्या सात विद्यार्थ्यांच्या टीमने देखील त्याला मदत केली.