गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला स्वित्झर्लंडमधील जगातील पहिला मोठा रेल्वे भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. १९४७ मध्ये एका इंजिनिअरने या भुयारी मार्गाचा आराखडा बनवला होता. पण हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी साठ वर्षांहूनही अधिक काळ गेला. स्वित्झर्लंडच्या वेळेप्रमाणे रविवारी सकाळी या रेल्वे मार्गामधून पहिली ट्रेन रवाना झाली.

वाचा : ‘शंघाय टॉवर’मध्ये आहे जगातील सर्वात वेगवान उद्वाहन

Mumbai local-train
Mumbai Local : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल सेवा विस्कळीत; एकापाठोपाठ लोकलच्या रांगा!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
Historic Mumbai Local Train (EMU) completing 100 years
100 Years of EMU Trains: विजेवर धावलेल्या ऐतिहासिक लोकल ट्रेनला १०० वर्षे पूर्ण; CSMT ते कुर्ला पहिली EMU कशी धावली?
Rajewadi Station , Purandar Airport ,
पुणे : राजेवाडी स्थानकापासून पुरंदर विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका, एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकल्प प्रस्तावित
mahakumbh 2025
Maha Kumbh 2025 : पवित्र कुंभस्नानासाठी ४८ लाख भाविकांचा ट्रेनने प्रवास, मौनी अमवास्येकरता रेल्वेकडून खास नियोजन!
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
Mumbai Local Mega Block
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक असणार

स्वित्झर्लंडमधला हा भुयारी मार्ग जगातील सगळ्यात लांब आणि मोठा रेल्वे भुयारी मार्ग आहे. अखेर सतरा वर्षांच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या भुयारी मार्गाची लांबी ५७ किलोमीटर इतकी आहे. हा लांबलचक मार्ग बनवण्यासाठी तब्बल ८० हजार कोटी रुपये खर्च झालेत. १९४७ साली स्विझ इंजिनिअर कार्ल एडवर्ड ग्रूनर याने या भुयारी मार्गाचा आराखडा बनवला होता. पण हा प्रत्यक्षात यायला मात्र सहा दशक उलटली. या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. १९९९ पर्यंत या मार्गाचे निर्माण कार्य या ना त्या कारणाने पुढे ढकलेले जात होते. अखेर १७ वर्षांनंतर तब्बल ८० हजार कोटींहूनही अधिक खर्च करून हा भुयारी रेल्वे मार्ग बनण्यात आला. आल्प्स पर्वतातून हा भुयारी मार्ग जातो.

वाचा : ..म्हणून पॅरिसमध्ये सार्वजनिक वाहतूक केली मोफत

यावर्षी जून महिन्यातच या भुयारी मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले होते. तेव्हा जर्मन चांसलर एंजेला मॉर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी याचे उद्धघाटन केले होते. त्यानंतर चार महिन्यांनी हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्वित्झर्लंडच्या वेळेप्रमाणे रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास या मार्गातून पहिली रेल्वे गेली. या मार्गातून दररोज ६५ प्रवासी रेल्वेगाड्या आणि २६० मालगाडी जाणार आहेत. यापूर्वी जगातील सर्वात मोठा भुयारी रेल्वे मार्ग असण्याचा मान जपान या देशाकडे होता. ‘सकान टनल’ म्हणून ओळखल्या जाणा-या या रेल्वेमार्गाची लांबी ही ५३ किलोमीटर होती.

Story img Loader