मानवी संरक्षणात जगणाऱ्या जगातील सर्वात वृद्ध पांडाला गुरुवारी इच्छामरण देण्यात आले. हाँगकाँगमधील ओशन थीम पार्कच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हा पांडा इथे राहत होता. त्याचे नाव ‘अॅनअॅन’ असे होते. त्याची प्रकृती सतत खालावत चालली होती, तसेच वृद्धापकाळामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही आठवड्यांपासून त्याची तब्येत सतत ढासळत होती. त्याने खाणेपिणे सोडले होते. अखेर काही दिवस त्याने खाणे पूर्णपणे बंद केले. या उद्यानात सागरी प्राणी आणि संरक्षित प्राणीही ठेवण्यात आले आहेत. हा पांडा १९९९ पासून येथे राहत होता. उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी जिया जिया नावाची मादी पांडा २०१६ मध्ये मरण पावली. तेव्हा तिचे वय ३८ वर्षे होते.
ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी लढवली शक्कल; लोकलमधील इतर प्रवाशांना पण केलं सामील; पाहा नक्की काय झालं
हे दोन्ही नर आणि मादी पांडा चीन सरकारने थीम पार्कला भेट म्हणून दिले होते. पार्कने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पांडाच्या मृत्यूची माहिती देताना त्यांना खूप दु:ख होत आहे. या दोघांच्या मदतीनेच ओशन थीम पार्क पांडा संवर्धनाचा एक महत्त्वाचा आधार बनला.
अॅनअॅन त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य होता, असे पार्कच्या वतीने सांगण्यात आले. त्याचा विकास आणि उद्यानाचा विकास जवळजवळ एकाच वेळी सुरू झाला आणि दोघे एकत्र वाढले. या पांडाची स्थानिक लोकांशी आणि पर्यटकांशीही चांगली मैत्री होती. अशा प्रकारे वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, जे मनुष्याच्या १०५ वर्षांच्या बरोबरीचे आहे.
CCTV : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स…
ओशन थीम पार्कमध्ये वालरस, पेंग्विन आणि डॉल्फिनसारखे सागरी संरक्षित प्राणी ठेवण्यात आले आहेत. तसेच, यिंग यिंग आणि ले ले अशी आणखी दोन पांडा आता येथे राहतात. चीनने २००७ मध्ये मादी यिंग यिंग आणि नर ले ले हाँगकाँगला दिली. पार्कला आशा होती की या जोडप्याला मुले होतील. मात्र, अद्याप तसे झालेले नाही आणि पुढे प्रगती होण्याची चिन्हेही दिसत नाहीत.