सोशल मीडियावर रोज कोणती ना कोणती बातमी व्हायरल होत असते. अशीच एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. ही बातमी आहे ब्रिटनमधील. ब्रिटनमधील एका पबमधून २०० वर्ष जुनी एका महिलेच्या कवटीची चोरी झाली आहे. या चोरीनंतर एकच खळबळ उडाली आहे. या पबच्या मालकाने सोशल मीडियावर एक अपील जारी केले आहे. ज्यांनी कोणी ही कवटी चोरली आहे त्याने ती परत करावी असे आवाहन यात करण्यात आले आहे. ही बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
युके टाइम्सच्या वृत्तानुसार, ज्या महिलेची कवटी चोरी झाली आहे ती १९व्या शतकातील आहे. ही कवटी एलिझाबेथ जोन्सची आहे, ज्यांना १८०० साली बँक नोट घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते. या गुन्ह्यासाठी त्या महिलेला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याच महिलेच्या कवटीची प्रतिकृती पबमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. पण चोरट्यांनी ही कवटी पबमधून चोरली.
‘या’ शहराचा असणार स्वतःचा चंद्र; रोबोट देणार सेवा, तर हवेत उडणार कार
द गोल्डन फ्लीस या एका पबमध्ये ही कवटी ठेवण्यात आली होती. या कवटीशी निगडित अनेक कथा सांगितल्या जातात. सध्या सोशल मीडियाच्या साहाय्याने ही कवटी चोरणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.