Worlds smallest escalator: एस्केलेटर आता मॉलपासून, रेल्वेस्टेशनपर्यंत कॉमन झालं आहे. एक काळ असा होता जेव्हा लोकांना याचं अप्रुप वाटायचं, पण आता मात्र ते सर्वांसाठी फारच कॉमन झालं आहे. ज्यामुळे जिने चढावे लागत नाही आणि त्यामुळे थकवा येत नाही. फक्त एक पाऊल टाकायचं आणि हे एस्केलेटर तुम्हाला वरच्या किंवा खालच्या मजल्यावर पोहोचवते.अनेक देशांमध्ये आता या एस्केलेटर वापरायला सुरुवात झाली आहे. एस्केलेटर हा दैनंदिन प्रवासाचा प्रमुख भाग बनला आहे. ते लोकांना काही सेकंद आराम आणि विश्रांती देतात कारण एखाद्याला मजले चढण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही. मात्र याउलट जगातील सर्वात लहान एस्केलेटर कुठे आहे हे तु्म्हाला माहितीये का? लहान म्हणजे या एस्केलेटरला अवघ्या ५ पायऱ्या आहेत.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकं अवाक् झाले आहेत.
गिनीज बुक वर्ल्ड रिकॉर्डमध्ये या एस्केलेटरची नोंद झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हे आहे तरी नेमकं कुठे? तर हे जगातील सर्वात लहान एस्केलेटर जपानमध्ये आहे. जपानमध्ये असणाऱ्या एस्केलेटरची उंची ८३ सेमी इतकी आहे तर अंतर जे आहे ते २.७ फूट इतकं आहे. अवघ्या पाच पायऱ्या चढण्यासाठी या एस्केलेटरचा वापर तेथील लोक करतात. जगातील हे सर्वात लहान एस्केलेटर जपानमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आहे.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, तरुणीच्या मागे हे एस्केलेटर दिसत आहे. या एस्केलेटरच्या बाजूला अवघ्या ५ पायऱ्या दिसत आहेत. म्हणजे पाच पायऱ्यांच्या अंतराचं हे एस्केलेटर आहे. आता तुम्हाला वाटेल पाच पायऱ्या चढण्यासाठी कोण एस्केलेटरचा वापर करत असेल? तर तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहा. अवघ्या पाच पायऱ्या चढण्याएवजी लोक या छोट्या एस्केलेटरचा वापर करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> हेल्मेट न घालता गाडी चालवता? मग कीबोर्डवर Q आणि R मध्ये पाहा; दिल्ली पोलिसांनी ट्रेंड फॉलो करत केलं सावधान
kavi_gomase नावाच्या भारतीय तरुणीनं जी आता जपानमध्ये आहे तीनं हा व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या कमेंट येत आहेत. काहींना ही माहिती नव्यानं कळल्यामुळे नेटकरी भारतीय तरुणीचं कौतक करत आहेत.