चीनच्या नावे अनेक विश्वविक्रम आहेत. इंजिनिअरींगचे आश्चर्यात टाकणारे अनेक नमुने त्यांनी तयार केले आहेत. काचेच्या पुलानंतर आता चीनमधला सगळ्यात उंच पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

वाचा : विश्वविक्रमी काचेचा पूल अवघ्या दोन आठवड्यातच बंद

धुक्यात हरवलेला आणि आकाशाला कवेत घेऊ पाहणारा जगातील सर्वात उंच पूल हा गुरुवारी वाहतुकीसाठी खूला करण्यात आला. पण बघता बघता या पुलावरून जाण्यासाठी वाहनांनी अक्षरश: गर्दी केली होती. बेईपानजियांग पूल म्हणून हा पूल ओळखण्यात येतो. दोन प्रांतांना जोडणारा हा पूल आहे. हा पूल जमीनीपासून १ हजार ८५४ फूट उंचीवर आहे. युनाना आणि गीझू या दोन प्रांतांना जोडणारा हा पूल आहे. या दोन्ही ठिकाणी पूर्वी पोहचण्यास चार तासांहूनही अधिक वेळ लागायचा पण आता आता हे अंतर फक्त एक तासात चालक पार करू शकतो.
या पुलाची लांबी एक हजार ३४१ मीटर आहे. त्यामुळे आता जगातील सर्वात उंच पुलाच्या यादीत या पुलाचा सामावेश झाला आहे. चीनमध्ये अनेक उंच पूल आहेत. सप्टेंबरमध्ये चीनमध्ये जगातील पहिला उंच काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. या काचेच्या पुलावर चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केली होती. पण, फक्त दोन दिवसांत सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल बंद करण्यात आला होता.

वाचा : पुन्हा एकदा पाहायला मिळणार ‘टायटॅनिक’

Story img Loader