जगातील सर्वात उंच महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुमेयसा गेल्गी हिने ती विमान प्रवास कसा करते हे दर्शवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की तिला विमानात प्रवास करताना स्ट्रेचर झोपावे लागते पण का? हेच तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (GWR) द्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रुमेयसा गेल्गीने तुर्की एअरलाइन्ससह विमान प्रवासाचा व्हिडिओ शुट केला आहे. आणि युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडमला भेट दिल्याबद्दल तिचा उत्साह व्यक्त केला.
“जगातील सर्वात उंच महिला तिच्या मैत्रिणींना कशी भेट देते? टर्किश एअरलाइन्सने रुमेसा गेल्गीच्या यूएस आणि यूकेमध्ये प्रवासासाठी फ्लाइट उपलब्ध करून दिली,” असे इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ पोस्टचे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, रुमेयसा गेल्गी विमानात चढताना स्ट्रेचरवर झोपलेली दिसत आहे. एअरलाइन कर्मचारी तिला स्ट्रेचरसह उचलून विमानात घेऊन जात आहे. “मी अक्षरशः खूप उत्साहित आहे, माझ्या हृदयाचे ठोके वाढत आहे,”असेही ती व्हिडीओमध्ये सांगते.
व्हिडीओमध्ये रुमेयसा गेल्गीने तिची आगळ्या वेगळ्या प्रवासाबाबत खुलासा केला. “मला स्कोलियोसिस(scoliosis) आहे, ही स्थिती पाठीच्या गंभीर वक्रतेतून (severe spinal curvature) दिसून येते. याव्यतिरिक्त, माझ्या मणक्यामध्ये दोन लांब रॉड आणि ३० स्क्रू आहेत ज्यामुळे मला वाकणे आणि वळणे टाळावे लागते. म्हणूनच विमान प्रवासा दरम्यान मला स्ट्रेचर वापरावे लागते. हा माझ्यासाठी सर्वात सुरक्षित आणि एकमेव पर्याय आहे.”
येथे व्हिडिओ पहा:
s
२१५.१६ सेमी (७फूट ०.७ इंच) उंची असलेली रुमेयसा गेल्गीकडे पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत आणि ती एक कार्यकर्ता, सार्वजनिक वक्ता आणि संशोधक देखील आहे. तिच्या विलक्षण उंचीचे श्रेय वीव्हर सिंड्रोमला दिले जाते. वीव्हर सिंड्रोम हे जन्माच्या वेळी निदान झालेले एक दुर्मिळ अनुवांशिक उत्परिवर्तन आहे.
रुमेयसा गेल्गी एक वकील आणि गुन्हेगारी कादंबरी वाचक आहे. इतरांना प्रेरणा देण्यासाठी ती अनेकदा तिचे अनुभव शेअर करते, तिचे कुटुंब तिच्या पाठीशी अभिमानाने उभे असते.
© IE Online Media Services (P) Ltd