देशभरातील सरकारी शाळांची दुरावस्था कोणापासून लपून राहिलेली नाही. सरकार कितीही दावे करत असले तरी खरी परिस्थिती वेळोवेळी समोर येत असते. अशात बिहारमधून एक ताजे प्रकरण समोर आले आहे. ज्यात शाळेची झालेली दुरुवस्था पाहून लोक सरकारने इकडेही लक्ष द्या अशी विनंती करत आहे. सोशल मीडियावर दुरावस्था झालेल्या शाळेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राज्यातील एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पावासाळ्यात शाळेचे छत गळत असल्याने वर्गात रोज छत्री घेऊन बसण्याची वेळी आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ बिहारमधील भागलपूरच्या गोपालपूर ब्लॉकमधील सैदपूर हायस्कूलमधील आहे. जो भाजप नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, बिहारमधील सरकारी शाळांची अवस्था अशी आहे की, पावसाच्या दिवसात विद्यार्थ्यांना छत्री घेऊन वर्गात बसावे लागतेय. एकीकडे बिहारचे शिक्षणमंत्री राम चरित्र मानसची चर्चा करत आहेत आणि मुख्यमंत्री नितीशबाबू पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहेत, तर दुसरीकडे बिहारमधील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे! ना शिक्षण ना रोजगार. फक्त भ्रष्टाचार.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

यावर अनुज नावाच्या युजरने लिहिले की, ‘निर्लज्जपणाचीही एक मर्यादा असते, गेली २० वर्षे एकत्र सत्तेत वाटा होता तेव्हा दिसले नाही. ६ महिन्यांत संपूर्ण छत गळू लागले. सत्य हे आहे की, भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांकडे असलेली सर्व खाती नष्ट झाली आहेत.

यात देवेंद्र नावाच्या एका युजरने लिहिले की, जेव्हा जेव्हा राजकारणात एखाद्या सुशिक्षित व्यक्तीची चर्चा होते तेव्हा फक्त ‘नेता’ आणि त्याचे समर्थक का नाराज होतात? निरक्षरतेशी निगडीत गोष्टी फक्त ‘त्यांच्या’साठीच केल्या गेल्या असं का वाटतं. त्यांचा त्यांच्या ‘डिग्री’वर विश्वास नाही का?

व्हायरल व्हिडीओमधील शाळा १९४१ मध्ये स्थापन झाली होती. सध्या शाळेची दुरवस्था झाली आहे तरीही याकडे कोणाचे लक्ष नाही. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक गिरीश कुमार मंडल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुलांबरोबरच पालकही तक्रार करतात, पण आम्ही काय करू. जिल्ह्यातील शिक्षण विभागाला दरवर्षी पत्रांद्वारे माहिती दिली जात आहे, मात्र अद्याप कोणताच पुढाकार घेण्यात आलेला नाही. इमारतीच्या बांधकामासाठी डीपीओ आणि डीईओ यांनाही माहिती देण्यात आली आहे, मात्र अद्यापपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. यावरून भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, बिहारमधील सरकारी शाळेची ही अवस्था आहे. पावसाळ्याच्या दिवसात मुलांना छत्री घेऊन वर्गात बसावे लागते. ही स्थिती कशी सुधारणार! बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी रामचरितमानसवर चर्चा करावी. आणि मुख्यमंत्री पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहण्यात गुंग आहेत! या भ्रष्ट आणि अहंकारी युतीतून बिहारच्या तरुणांना ना शिक्षण मिळेल ना रोजगार! हे भ्रष्टाचारी अहंकारी बिहार!

या संपूर्ण प्रकरणावर राज्य सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. पण अशाप्रकारच्या शिक्षण व्यवस्थेवर तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंटमधून सांगा.