स्लीपर्स आणि चप्पलमध्ये सध्या ट्रेंडमध्ये आहे ती ‘फ्लिप फ्लॉप’ चप्पल. बिचवेअर म्हणून तरुण मंडळींमध्ये फ्लिप-फ्लॉपची वेगळीच क्रेज आहे. पण, आता रोजच्या वापरासाठी या फ्लिप फ्लॉपचा उपयोग अनेक जण करू लागले आहेत. कार्टून्स, इमोजी, काही मजेशीर मजकूर लिहिलेले फ्लिप फ्लॉप बाजारात विविध रंगात आणि स्टाईलमध्ये उपल्बध असतात. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत फ्लिप फ्लॉप चप्पल कारखान्यात कशी तयार जाते हे दाखवण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे मायक्रो प्लास्टिक एका टबमध्ये भरून ठेवलं आहे. त्यानंतर टबमधून एका छोट्या ग्लासमध्ये हे मायक्रो प्लास्टिक भरून त्याचे वजन काट्यावर वजन केले जात आहे. त्यानंतर कारखान्यातील कामगार चप्पल तयार होणारा साचा स्वछ करून घेतो आहे. नंतर दुसरे कामगार मायक्रो प्लास्टिकने भरलेलं ग्लास घेऊन येत आहेत. तुम्ही सुद्धा बघा कशाप्रकारे तयार होतात फ्लिप फ्लॉप चप्पल.
हेही वाचा… झटक्यात केली शेगडी दुरुस्त! व्यक्तीची अनोखी शैली, स्पीड पाहून व्हाल थक्क; पाहा व्हायरल VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, कारखान्यात फ्लिप फ्लॉप चप्पल बनवण्यासाठी एक मशीन आहे. इथे छोटे छोटे चप्पलच्या आकाराचे साचे आहेत. या साच्यात कारखान्यातील एक कामगार येऊन मायक्रो प्लास्टिक भरून घेतो. त्यानंतर मशीन बंद होते आणि थोड्याच वेळात हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची आकर्षक अशी फ्लिप फ्लॉप चप्पल तयार होऊन बाहेर येताना दिसते.
त्यानंतर तयार झालेल्या फ्लिप फ्लॉपला कारखान्यातील कागमार शिवून घेत आहेत आणि मग स्टॅम्प लावून विक्रीसाठी बॉक्समध्ये पॅक केलं जात आहेत.सोशल मीडियावर हा व्हिडीओ @bhookhasher1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नीरज कोळी असे या युजरचे नाव असून हा एक ब्लॉगर आहे.