सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही मनोरंजक असतात तर काही फक्त प्रसिद्धीसाठी केलेले स्टंट असतात. सोशल मीडियावर व्हायरल अनेकदा अफलातून नृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच एका तरुणाने अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले आहे. तरुणाचा डान्स पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकांमध्ये असणाऱ्या फुलवंती चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे निर्माती म्हणून प्राजक्ताचा हा पहिला चित्रपट आहे. पेशवाई काळातील प्रसिद्ध नर्तका असणारी फुलवंती आणि पंडित व्यंकटशास्त्री यांच्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फुलवंती चित्रपटातील अशी मदन मंजिरी हे गाणे चर्चेत आहे. या गाण्यावर प्राजक्ताने अफालतून डान्स केला आहे. तिच्या या गाण्यावर अनेकजण डान्स करताना दिसत आहे. पण सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यांने “अशी मी मंदन मंजिरी” गाण्यावर अप्रतिम डान्स करून थेट प्राजक्ता माळीला टक्कर दिली आहे.

हेही वाचा –“जीव एवढा स्वस्त आहे का?” मोबाइल बघत रेल्वे रुळ ओलांडत होता तरुण, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…;Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण फुलवंती चित्रपटातील “अशी मी मंदन मंजिरी” या प्रसिद्ध गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. तरुणाने गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर अचूकपणे नृत्य केले आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील अगदी नृत्याला साजेशे आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून, लावणी नृत्यावर तरुणही इतका चांगले नृत्य करू शकतो यावर नेटकऱ्यांना विश्वास बसत नाही.

हेही वाचा –“बाईपण भारी देवा! इतरांसाठी जगताना स्वत:ला विसरू नका,” कास पठारला भेट देणाऱ्या महिलांचा Video Viral

व्हिडिओ vedanceनावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा मुलंही ट्रेड फॉलो करतात”

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तरुणाचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट करत म्हटले की, वाह, मला वाटते की, “तु तिच्या(प्राजक्ता माळीपेक्षा) चांगला डान्स केला”

हेही वाचा –“हे कसं शक्य आहे?”, गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या शिखरावर पोहचला श्वान, पण कसा? पॅराग्लायडरने शेअर केलेला Video Viral

दुसऱ्याने कमेंट केली, “अप्रतिम, सुपर, देव तुझ्यावर कृपा करो”

तिसऱ्याने कमेंट केली की, ” सुंदरीची फ्रेम खूप आली आहे”

चौथ्याने कमेंट केली की, “मस्त भावा”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wow the amazing dance of young boy on the song ashi mi madan manjari beats phulwanti watch viral video snk