जेव्हा कोणता फुटबॉल प्लेअर आपल्या टीमसाठी गोल करतो तेव्हा तो आवर्जून आपल्या दुसऱ्या टीम मेंबरसोबत त्याचा आनंद व्यक्त करतो. टीव्ही किंवा प्रत्यक्ष फुटबॉल मॅच बघताना आपण नेहमी ही गोष्ट बघितलेली आहे. पण तुम्ही असं कधी एखाद्या प्राण्याला करताना बघितलं आहे का? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक हरीण चक्क फुटबॉल खेळत आहे. ते केवळ फुटबॉल खेळतच नाही तर गोलही करतं. गोल केल्यानंतर तो जे करतो ते खरच बघण्यासारखं आहे.

हरणाने केला गोल

स्वतःला गोल केल्यानंतर ते हरीण त्या गोलच सेलिब्रेशनही करत. या सेलिब्रेशनचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला हे. व्हिडीओमध्ये फुटबॉल रिकाम्या जाळीत टाकण्यापूर्वी हरीण त्याच्या शिंगांनी चेंडू ड्रिब्लिंग करताना दिसतो. यानंतर तो रिकाम्या जाळीत बॉल टाकून गोल करतो. गोल केल्यानंतर हरीण खूप आनंदी होत आणि नाचायला लागतं.

(हे ही वाचा: डोक्यावर विग, न दिसणारे इअरफोन परीक्षेत कॉपी करण्यासाठी हटके जुगाड; video viral)

( हे ही वाचा: Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं)

व्हिडीओ प्रचंड व्हायरल

हा व्हिडीओ २०१९ चा आहे, परंतु एका ट्विटर वापरकर्त्याने तो पुन्हा शेअर केला आहे जो त्वरीत व्हायरल झाला, आतापर्यंत ११ हजार रीट्विट्स आणि ५० हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले. हा व्हिडीओ @SteveStuWill ने ट्विटरवर शेअर केला आहे. योगायोगाने, हा व्हिडीओ अशा वेळी समोर आला आहे जेव्हा फुटबॉल विश्व पुन्हा एकदा करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे प्रभावित होत आहे. इंग्लंडमध्ये, या आठवड्यात नियोजित १० प्रीमियर लीग सामन्यांपैकी पाच कोविडमुळे पुढे ढकलण्यात आले आहेत.

Story img Loader