तुम्हाला दंगल चित्रपट आठवतोय? आपल्या मुलींना कुस्तीपटू करण्यासाठी अमिर खानने काय काय केले हे आपण पाहिले. त्यामुळे शरीर कमावण्यासाठी शक्ती वाढविण्याबरोबरच आहारातही अनेक बदल करावे लागतात हे आपण चित्रपटातून पाहिले. हरयाणातील जगाधरीमधील गुरविंदर उर्फ शँकी आपले शरीर कमावण्यासाठी असेच प्रयत्न करत आहे.

त्याला जगभरात प्रसिद्ध असलेल्या रेसलर खलीप्रमाणे आपले शरीर कमावून जगात नाव मिळवायचे आहे…य़ासाठी तो खलीच्या अॅकॅडमीत प्रशिक्षणही घेत आहे…इतकेच नाही तर त्याला अमेरिकेसारख्या देशातून बोलावणेही येण्याची शक्यता आहे. आता असे काय आहे की ज्यामुळे गुरविंदर या २७ वर्षीय तरुणाला इतकी डिमांड आली आहे. तर खलीप्रमाणेच त्याला रेसलिंगमध्ये आपले करियर करायचे आहे. त्याच्या घरची अर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. सध्या तो खलीच्या जालंदरमधील अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. इतकेच नाही तर आतापर्यंत तो अनेक रेसलिंगच्या स्पर्धा जिंकला आहे.

शँकी सांगतो डब्लूडब्लूएफसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी वजनाहून दुप्पट प्रमाणात प्रोटीन घ्यावे लागतात. त्याचे वजन १३० किलो असून उंची सात फूट आहे. त्याला पुरेशा प्रोटीनसाठी दररोज दिवसातून ४० हून अधिक अंडी आणि एक किलो चिकन आणि त्यासोबत भात किंवा चपात्या खाव्या लागतात. तो रोज केवळ नाश्त्यासाठी दीड डझन अंडी, दलिया आणि दोन लिटर दूध घेतो. त्याचा दर महिन्याचा खर्च ५० हजार इतका आहे. याआधीच चांगला आहार मिळाला असता तर आपण मागच्या वर्षीच अमेरिकेत डब्लूडब्लूएफच्या स्पर्धेसाठी गेलो असतो असे शॅकी म्हणाला. त्याचे वडिल एका खासगी कंपनीत नोकरी करत असून आई गृहीणी आहे. त्याला दोन लहान बहीणी आहेत.

Story img Loader