Anand Mahindra Tweet: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महिंद्राने अखेर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी ‘बिग डॅडी ऑफ एसयूव्ही’ महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची डिलिव्हरी सुरू केली आहे. डिलिव्हरीच्या पहिल्याच दिवशी, ऑलिम्पिक पदक विजेती गीता फोगटने तिच्या घरी महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे स्वागत केले. आनंद महिंद्रा यांना ही बातमी कळताच त्यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गीता फोगटने अशी ‘अतुलनीय कार’ बनवल्याबद्दल महिंद्राचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत ज्याला आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका ट्विटमध्ये आपला आनंद व्यक्त करताना फोगट म्हणाले, “एवढ्या सुंदर दिवशी किती छान सकाळ आहे.. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आमच्या नवीन सदस्याचे आमच्या घरी स्वागत आहे (महिंद्रा स्कॉर्पिओ-एन) @anandmahindra सर अशी कार लाँच केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अविश्वसनीय कार- खूप धन्यवाद. उत्कृष्ट सेवेबद्दल पीपी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कर्नालचे आभार.

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

( हे ही वाचा: ‘रील’साठी सापाबरोबर पोज देणं साधुला पडलं महाग; हकनाक गमावला जीव)

आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया

गीता फोगटच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, हा आमच्यासाठी बोनस आहे. गीता फोगट सारख्या प्रतिभावान व्यक्तिने स्कॉर्पिओ एन कारची निवड करणे आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे. तुमच्या सुवर्णपदकाच्या गौरवाचा आनंद आम्ही घेत आहोत, आम्हाला खात्री आहे की ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल.

नुकत्याच लाँच झालेल्या Scorpio N च्या चाहत्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. या वाहनाची लोकप्रियता एवढी आहे की, बुकिंग विंडो उघडल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत या वाहनाचे १ लाखांहून अधिक लोकांनी बुकिंग केले होते.

Story img Loader