WWE मधील प्रसिद्ध रेसलर ‘द ग्रेट खली’ सोशल मीडियावर या ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेत असतो. ७ फूट उंच असणाऱ्या खलीची आज भारतात एक वेगळी ओळख आहे. त्याच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. दुसरीकडे, उंच आणि धिप्पाड शरिरयष्टी असल्याने अनेकांना त्याच्यासमोर येताना भीती वाटते. असं असलं तरी सोशल मीडियावर खलीचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. त्याने एक पोस्ट किंवा फोटो जरी शेअर केला तरी कमेंट्सचा वर्षाव होत असतो. काही दिवसांपूर्वी खली क्रिकेटच्या चेंडूने नव्हे तर फुटबॉल आकाराच्या चेंडूने क्रिकेट खेळत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता द ग्रेट खली आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
व्हायरल व्हिडिओत खली एका बांधकाम होत असलेल्या ठिकाणाची पाहणी करताना दिसत आहे. यावेळी एक मजूर घमेलं घेऊन परांचीवर उभं असलेल्या सहकाऱ्याला देण्यासाठी घेऊन चालला होता. तेव्हा तिथपर्यंत त्याचा हात पोहोचणार नाही याची जाणीव खलीला झाली आणि तो पुढे आला. त्याने आपल्या हाताने घमले घेत परांचीवर उभ्या असलेल्या मजुराच्या हाती दिलं. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
काही दिवसांपूर्वी खलीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यामुळे पंजाब निवडणुकीपूर्वी खली आम आदमी पक्षात सहभागी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आम आदमी पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून खली आणि केजरीवाल यांचा फोटो शेअर केला होता. द ग्रेट खलीचे नाव दिलीप सिंह राणा आहे. तो मूळचा हिमाचल प्रदेशचा आहे. लहानपणापासूनच खलीला एक्रोमेगली नावाचा आजार होता. खली या आजारामुळे खचून गेला नाही. त्याने त्याकडे सकारात्मकतेने पाहिले.