दैव तारी त्याला कोण मारी! असं म्हणतात. याचाच प्रत्यय चीनमधल्या एका चालकाला आला. आपली आलिशान कार घेऊन तो जात होता पण अचानक रस्त्याच्या कडेला असणारी क्रेन त्याच्या भरधाव येणाऱ्या कारवर कोसळली, अन् त्याला काही कळायच्या आतच त्याच्या आलिशान कारचा चुराडा झाला. पण सुदैवानं एवढ्या मोठ्या अपघातातून तो अगदी सुखरूप बचावला. काळ आला होता खरा पण वेळ आली नव्हती, या गंभीर अपघातात त्याच्या पायाला इजा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral : हा अपघात पाहिलेले रात्रभर झोपू शकणार नाहीत!

रस्त्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात अपघाताची दृश्य कैद झाली आहे. रस्त्याच्या कडेला बांधकाम सुरू होतं तेव्हा ही क्रेन कोसळली. या तरुणाने नुकतीच ऑडी कार घेतली होती, पण अनपेक्षित अपघाताने मात्र त्याचं मोठं नुकसान झालं. कारच्या छतावर असलेल्या काचेतून त्याने आपली सुटका करून घेतली. दरम्यान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत्यू कधीही आणि कसाही येऊ शकतो पण तुमचं दैव बलवत्तर असेल तर मात्र तुम्ही मृत्युलादेखील चकवा देऊ शकता हे जणू या व्हिडिओतून दिसलं.