Girls Fight Outside Amity University Video Viral : कॉलेजमध्ये मजा-मस्करीत मित्र-मैत्रिणींमध्ये अनेकदा वाद होतात. काही वाद सहज मिटतात; पण काही इतक्या टोकाला जातात की, ते हाणामारीपर्यंत पोहोचतात. सहसा आपण मुलांच्या ग्रुपमध्ये अनेकदा मारामारी होत असल्याचे पाहतो; पण नोएडातील एमिटी विद्यापीठाच्या आवारात चक्क दोन तरुणी हाणामारी करताना दिसत आहेत. एमिटी विद्यापीठाचे विद्यार्थी अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादात सापडतात. अनेकदा या विद्यापीठातील लोक हाणामारी करताना आणि गोंधळ घालतानाच दिसतात. सध्या आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये चक्क दोन तरुणी विद्यापीठाच्या भरकॅम्पसमध एकमेकांना जबर मारहाण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिथे अनेक तरुण भांडण सोडवायचं सोडून जोरजोरात हसत मजा घेत होते.

हा व्हिडीओ एमिटी विद्यापीठाच्या बाहेरील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील हाणामारी करणाऱ्या तरुणी एमिटी विद्यापीठाच्याच होत्या, असे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणींमध्ये काही कारणावरून वाद सुरू होतो. हा वाद नंतर हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचतो. यावेळी दोन्ही तरुणी आधी एकमेकांची मान पकडतात आणि नंतर त्या मारामारी करता करता एक टेबलवरून खाली कोसळतात.

तरुणी भांडत असताना मुलं हसून घेत होती मजा (Girls Fighting Video)

ज्यावेळी दोघींमध्ये हाणामारी सुरू होती त्यावेळी तेथे मोठ्या संख्येने मुले-मुली उपस्थित होत्या; मात्र कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. खरे तर सगळेच फक्त हसत-खिदळत जोरजोरात ओरडत होते. हाणामारी करताना दोघीही एका टेबलवरून जमिनीवर पडल्या. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यांतील तरुणी त्या दोघींना थांबवण्याचा प्रयत्नही करीत होती; पण इरेला पेटलेल्या त्या दोघी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओची लोकसत्ता डॉट कॉम पुष्टी करीत नाही.

More Stories On Viral Video : पठ्ठ्याने चक्क बँक ATM मध्ये उघडले शिलाईचे दुकान; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “फाटलेल्या नोटा आता…”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक सोशल मीडिया युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, असा आपला समाज आहे. दोन मुलींमध्ये भांडण सुरू आहे आणि सर्व जण मजा बघत उभे आहेत. एकाने लिहिले की, आजकाल मुली स्वतःची चेष्टा करून घेत आहेत. त्यांना कोणाचीच पर्वा नाही. आणखी एका युजरने लिहिले की, तेथे उपस्थित असलेले लोक हाणामारी सुरू असताना हुल्लडबाजी करीत आहेत, ही सर्वांत वाईट गोष्ट आहे.

हेही वाचा – “वाचवा मला!” पिटबुल कुत्र्यांचा डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला; चाव्यांनी हात-पाय केले रक्तबंबाळ; थरारक video व्हायरल

दरम्यान अनेकांनी विद्यापीठ परिसरात घडलेली ही घटना अतिशय वाईट असल्याचे म्हणत हे प्रकार रोखण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.