१९९० च्या दशकात जन्मलेल्या आणि या काळात वाढलेल्या मुलांसाठी ‘अंडरटेकर’ हे नाव काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘डेडमॅन’ या नावाने प्रसिध्द असलेला डब्ल्यूडब्ल्यूई स्टार अंडरटेकर आता त्या कुस्तीच्या रिंगमध्ये पुन्हा दिसणार नाही. कारण सर्वांच्या फेव्हरेट असलेल्या या स्टारने आता निवृत्ती घेतलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दोन दशकांपेक्षा जास्त काळ डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये (आधी डब्ल्यूडब्ल्यूएफ) मध्येे ‘अंडरटेकर’ प्रचंड फेमस होता. लहानपणी तुम्ही जर डब्ल्यूडब्ल्यूएफचे पत्ते खेळला असाल तर तुम्हाला अंडरटेकर, ट्रिपल एच, द राॅक, खली, शाॅन मायकल, हल्क होगन असे रेसलिंग स्टार्स माहीत असतीलच. पण या सगळ्यांपेक्षा अंडरटेकर चा जलवा काही वेगळाच होता. स्टेडियममध्ये त्याची एंट्री करण्याची स्टाईल जाम फेमस होती. पाहा  त्याच्या एंट्रीचा हा व्हिडिओ

सौजन्य- यूट्यूब

WWE मधल्या कुस्त्या या ठरलेल्या असतात. तो एकप्रकारचा शो असतो. हे सगळ्यांना माहीतही असतं पण WWE मध्ये असलेल्या स्टार्समुळे त्याची लोकप्रियता कायमच मोठी असते. या स्टार्समध्ये अंडरटेकरचं स्थान वेगळंच होतं. ‘डेडमॅन’ म्हणून त्याची आजवर प्रसिध्दी करण्यात आली. त्याच्या या इमेजभोवती अनेक कथा रचण्यात आल्या होत्या. मग त्यामध्ये अंडरटेकर स्मशानात राहतो. तो सात वेळा जिवंत होऊ शकतो. एका कलशाकडे पाहिल्यावर त्याला ताकद येते अशा अनेक कथांचा समावेश होता. लहान  मुलांमध्ये म्हणूनच त्याच्याविषयी एक प्रकारचं कुतूहल होतं. पण यावर्षी झालेल्या ‘रेसलमेनिया’ नंतर त्याने निवृत्त व्हायचा निर्णय घेतलाय.

पण मुळात हा अंडरटेकर आहे तरी कोण? अंडरटेकरचं खरं नाव मार्क कॅलवे आहे.  २४ मार्च १९६५ ला त्याचा जन्म अमेरिकेत टेक्सासमध्ये झाला होता. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये त्याने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’चं शिक्षण घेतलं. त्याला खेळांची प्रचंड आवड होती.

मार्क कॅलवे

युरोपमध्ये प्रोफेशनल फुटबाॅल खेळण्याची त्याची इच्छा होती पण आपला निर्णय बदलत त्याने कुस्तीपटू व्हायचं ठरवलं. १९८४ पासून आपल्या कुस्तीच्या करिअरला सुरूवात करणाऱ्या अंडरटेकरने आता ३० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर आता निवृत्त व्हायचं ठरवलंय. आता तो त्याच्या चार मुलांसोबत छान आयुष्य जगणार आहे.

त्याच्या निवृत्तीमुळे डब्ल्यूडब्ल्यूईमधला आणखी एक आयकाॅन अॅक्टिव्ह रेसलिंगपासून दूर गेलाय हे नक्कीच. वी विल मिस यू डेडमॅन!