Old Lady Beats WWE Wrestler Video: आपल्यापैकी अनेकांच्या लहानपणाच्या आठवणीत रेसलिंग शो WWE चा मोठा वाटा असेल. कार्टून बघून कंटाळा आला की भन्नाट आणि ऍक्शन बघ्याची म्हणून आपोआप WWE च लावलं जायचं. अंडरटेकर, बिग शो, जॉनसेना, क्रेन असे कितीतरी मोठाले हट्टेकट्टे रेसलर आपल्या आठवणींचा भाग आहेत. कधीतरी आपल्यातही सुपर शक्ती यावी आणि या रेसर्लर्सना आपण धूळ चारावी असा विचार कधी ना कधी तुमच्याही डोक्यात येऊन गेला असेलच. पण अर्थात त्यांची उंची व वजन पाहता ही इच्छा पूर्ण करण्याचा वेडेपणा कुणीही करायला जाणार नाही. सामान्य माणूस तर नाहीच आणि म्हातारा जीव तर त्याहून नाही. पण आता हाच विचार एका आजीबाईंनी पुरता फोल ठरवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच सोशल मीडियावर स्वतः WWE च्या रेसलरने आपण कसा एका आजीकडून मार खाल्ला हे दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. थरथरत्या लाथाबुक्क्यांनी आजीने WWE रेसलरची अक्षरशः वाट लावली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की WWE स्टार रेसलर टोनी एटलस हा अक्षरशः जमिनीवर गार होऊन पडला आहे. तर त्याच्या अंगावर उभी राहून एक आजी त्याला पार धु धु धूत आहे. आधी तर आजीबाई आपल्या थरथरत्या हाताने त्या पेहेलवानाला बुक्के मारतात आणि मग चक्क बुटांसहित लाथा मारून रेसलरला दिवसा तारे दाखवतात. आपण मोजायला गेलात तर अवघ्या २६ सेकंदात आजीबाईंनी रेसलरला तब्बल ५० वेळा बुक्के मारले आहेत.

आजीबाईंनी WWE स्टारची केली धुलाई

हे ही वाचा<< नवऱ्याला बॉक्समध्ये भरलं, कडेवर उचललं अन् ‘ती’ पळत सुटली तेवढ्यात.. Video झाला व्हायरल

दरम्यान, ६८ वर्षीय WWE रेसलर टोनी एटलसने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्याला मारणारी ही महिला कोण आहे हे मात्र या व्हिडीओत सांगितलं नाही आहे. व्हिडीओच्या शेवटी टोनी हॅप्पी न्यू इअर म्हणत आपल्या फॅन्सना नववर्षाच्या शुभेच्छा देतो. बहुधा हा व्हिडीओ ठरवून केलेला प्रॅन्क असावा पण आपल्या आवडत्या रेसलरची अशी अवस्था पाहून फॅन्सही हैराण झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wwe wrestler tony atlas beaten by lady 50 times fans shocked by viral video svs