पोळी-भाजी, भात, पावभाजी, नान असे जवळपास सर्वच पदार्थ आपण दररोज हाताने खात असतो. अगदी बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतरही जर तुम्ही बिर्याणी, पुलाव किंवा भातासारखे पदार्थ मागवले, तर तेही आपण पटकन हाताने खाणे अधिक पसंत करतो. हाताने जेवणे ही भारतीय परंपरा तर आहेच; मात्र इतर बाकी देशांमध्येही काही ठरावीक पदार्थ खाताना चमचाऐवजी हाताचा वापर केला जातो. परंतु, सध्या सोशल मीडियावर एक महिला चमचाऐवजी हाताने जेवत असतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

आता यावर चर्चा होण्यासारखे किंवा व्हायरल होण्यासारखे काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचे उत्तर आहे; ज्या स्त्रीने हा व्हिडीओ शेअर कला, त्या स्त्रीचे ट्रोलिंग. तर झाले असे की, एक्स या सोशल मीडियावर @jusbdonthate नावाच्या अकाउंटद्वारे विमानतळावर असताना तिच्या बाजूला बसलेल्या महिलेचा जेवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक महिला हाताने डब्यामधील भात खात असताना आपल्याला दिसते. मात्र, व्हिडीओ शेअर करताना महिलेचा चेहरा लपवण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, “असे विमानतळावर असताना, माझ्या बाजूला बसलेली स्त्री, तिच्या हाताने का जेवत आहे?” अशी कॅप्शन लिहिलेली आहे. @jusbdonthate ही अमेरिकेची नागरिक असल्याचे तिच्या अकाउंटवरून लक्षात येते.

ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Bangladeshi actor Fact Check video in marathi
भारतात अमेरिकन महिलेची छेडछाड? रिक्षातून जाताना केलं संतापजनक कृत्य; VIDEO नेमका कुठला? वाचा, सत्य काय ते…
woman jumps from moving auto coz drunk driver took the wrong route in Bengaluru post viral on social media
चालत्या रिक्षातून महिलेने मारली उडी! दारूच्या नशेत ड्रायव्हरने तिला चुकीच्या ठिकाणी नेले अन्…; संतापजनक पोस्ट व्हायरल
Video of Mothers Anger Over Sons Hair Growth
“डोक्यावर झिपऱ्या आहे.. ते काप..” मुलाची हेअर स्टाइल बघून आईला आला संताप, पाहा मजेशीर VIDEO

हेही वाचा : Viral video : ‘मोये मोये ऑमलेट’ हा कोणता नवीन पदार्थ? व्हायरल झालेल्या ‘या’ व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा

मात्र, तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिची चांगलीच शाळा घेतली आहे. अनेकांनी एखाद्या व्यक्तीचा, महिलेचा जेवताना तिच्या नकळत व्हिडीओ काढणे अतिशय चुकीचे आहे, असे लिहिले आहे. काहींनी, मुळात हा व्हिडीओ त्या महिलेची परवानगी न घेता बनवून, शेअर का केला आहे, असा प्रश्न केला आहे. नेटकऱ्यांनी यावर नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहा.

एकाने, “अनेक संस्कृतींमध्ये, देशांमध्ये हाताने जेवले जाते,” असे लिहिले आहे. “अनेकांमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असते. त्यामुळे विनाकारण इतरांच्या सवयींमध्ये नाक खुपसू नये.” अशी दुसऱ्याने खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्याने, “जर कुणी फ्रेंच फ्राइज [पाश्चात्य पदार्थ] हाताने खात असले असते, तरी तुम्ही हा व्हिडीओ बनवला असता का? जगात अनेक पद्धती किंवा संस्कृती अस्तित्वात आहेत, याचे किमान भान ठेवा,” असे सुनावले आहे. “खरंच अत्यंत मूर्खपणा आहे हा. ती महिला कुणालाही त्रास न देता, अगदी शांतपणे जेवते आहे. इतर देशांमध्ये, त्यांच्या त्यांच्या रूढी, रीतिरिवाज आणि वेगळ्या संस्कृती असतात याबद्दल थोडीही माहिती तुम्हाला नाही, असे यावरून दिसते,” असे चौथ्याने लिहिले आहे. शेवटी “पिझ्झा, सॅण्डविच, बर्गर, वेफर्स असे कितीतरी पदार्थ आपणही हातानेच खातो. त्यामुळे या गोष्टीचा इतका बाऊ करण्याची काहीच गरज नाही,” असे पाचव्याने म्हटले आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत २४.५ मिलियन इतके व्ह्युज मिळाले असून, त्यावर १० हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत.

Story img Loader