करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदा एप्रिल महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आलं होतं. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात आले. या कालावधीत अनेकांनी इंटरनेटचा वापर केला. याहूने २०२१ या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक काय शोधले? याबाबत सर्व्हेक्षण केलं. याहूच्या अहवालात युजर्सच्या दैनंदिन शोधाच्या सवयींवर आधारित वर्षातील सर्वोच्च व्यक्तिमत्त्वे, न्यूजमेकर्स आणि इव्हेंट्स यांचा खुलासा झाला आहे. सर्व्क्णत समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, भारतातील ‘मोस्ट सर्च केलेले व्यक्तिमत्व’ नरेंद्र मोदी आहेत. या प्रकारात क्रिकेटपटू विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टॉप ३ मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. दिवंगत अभिनेते सिद्धार्थ शुक्ला आणि राजकारणी राहुल गांधी यांनी या श्रेणीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
‘टॉप न्यूजमेकर्स ऑफ २०२१’ श्रेणीमध्ये शेतकरी आंदोलन पहिल्या क्रमांकावर आहे. आर्यन खानने ड्रग्ज प्रकरण दुसऱ्या स्थानी आहे. तर ‘भारतीय केंद्रीय अर्थसंकल्प 2021, राज कुंद्रा आणि ब्लॅक फंगस हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. २०२१ च्या सर्वाधिक सर्च केलेल्या राजकारण्यांच्या यादीत नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर आहेत, ममता बॅनर्जी दुसऱ्या स्थानावर, तर राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चौथ्या क्रमांकावर आहेत. भाजपचे अमित शाह पाचव्या स्थानावर आहेत. एलन मस्क ‘मोस्ट सर्च केलेले बिझनेस पर्सन’ म्हणून अव्वल स्थानी आहेत. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या क्रमांक येतो. बिझनेस मॅग्नेट बिल गेट्स तिसऱ्या स्थानावर आहेत, रतन टाटा आणि बिग बुल राकेश झुनझुनवाला पहिल्या पाचमध्ये आहेत. सर्वाधिक शोधलेल्या क्रिप्टोकरन्सी श्रेणीत बिटकॉइन, डोगेकॉइन, शिबा इनू, इथरियम, युनिस्वॅपने टॉप-५ मध्ये स्थान मिळवले.
ट्विटरला मिनिटांमध्ये शेकडो, लाखो फॉलोअर्स गायब, तुम्हालाही हा अनुभव येतोय का?; नेमकं काय सुरु आहे?
दिवंगत अभिनेते सिद्धार्थ शुक्ला सर्वाधिक सर्च केलेले पुरुष सेलिब्रिटी श्रेणीत अव्वल स्थानावर आहेत. अभिनेता सलमान खान दुसऱ्या, अल्लू अर्जुन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुनीत राजकुमार आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थानावर आहेत. अभिनेत्री करीना कपूर ही २०२१ मध्ये भारतातील सर्वाधिक सर्च केली गेलेली महिला सेलिब्रिटी आहे. कतरिना कैफ चित्रपट ‘सूर्यवंशी’ रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. या यादीत प्रियांका चोप्रा जोनास, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपट, मालिका आणि ओटीटी सीरिजमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘राधा कृष्ण’ दुसऱ्या स्थानावर आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘मनी होस्ट – सीझन ५’ आणि ‘शेरशाह’ यांच क्रमांक लागतो.
‘मोस्ट सर्च केलेले इंडियन स्पोर्ट्स पर्सनॅलिटी’ या श्रेणीत विराट कोहली अव्वल, तर एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांनी अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.