मद्यपान करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र, तरीही बरेच लोक त्याच्या आहारी जातात. मद्याच्या किंमतीही महाग असतात. त्याच्या काही प्रकारांची किंमत हजारांमध्ये असते. व्हिस्कीची किंमत तर लाखांत असते. दरम्यान जपानमधील चक्क एका व्हिस्कीला ४.१४ कोटी रुपयांची बोली लागल्याचे समजले आहे. यामाझाकी ५५ असे या व्हिस्कीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामाझाकी ५५ ही जपानमधील सर्वात जुनी आणि मुल्यवान व्हिस्की आहे. या व्हिस्कीला सोथेबी ऑक्शनमध्ये ६५.२ कोटींची बोली लागली. त्यामुळे या व्हिस्कीच्या सिंगल शॉटची किंमत ही चक्क ४.७ कोटी रुपये इतकी झाली. यामाझाकी ५५ व्हिस्की १९६० मध्ये पहिल्यांदा डिस्टिल झाली होती.
फोर्ब्सच्या एका अहवालानुसार, या व्हिस्कीची किंमत ४९ लाख रुपये आहे. बीम संटोरी ही कंपनी ही व्हिस्की बनवते. २०२० मध्ये पहिल्यांदा ही व्हिस्की लाँच करण्यात आली होती. त्यावेळी व्हिस्कीच्या केवळ १०० बाटला लॉटरी सिस्टिमद्वारे जपानमध्ये उपलब्ध करण्यात आल्या होत्या. इतर देशांसाठी २०२१ मध्ये १०० बाटला तयार करण्यात आल्या होत्या.

(अबब.. चक्क डोक्याने खेळत आहेत टेबल टेनिस! कुणी मारली बाजी? पाहा श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना)

यामाझाकी ५५ काही महागड्या सिंगल माल्टद्वारे तयार करण्यात आली आहे. ही व्हिस्की अत्यंत दुर्मिळ असल्याने ती कमी प्रमाणात उपलब्ध आहे, आणि हेच तिचे महागडे असल्याचे सर्वात मोठे कारण देखील आहे. तसेच, ही व्हिस्की तयार करण्यासाठी तिला अनेक वर्षे पिप्यांमध्ये साठवून ठेवले जाते. या प्रक्रियेला एजिंग म्हणतात. व्हिस्कीला चव, रंग आणि चांगली घडण देण्यात या पिप्यांची मोठी भूमिका असते.

यामाझाकी ५५ ला पण अशाच पिप्यांमध्ये ठेवल्या जाते. याला मिजुनारा कास्क असे म्हटले जाते. याला मिजुनारा झाडाच्या लाकडापासून तयार केले जाते. हे लाकूड खूप दुर्मिळ आहे. मिजुनारा कास्क बनवण्यासाठी झाड किमान २०० वर्ष जुने असावे असे सांगितल्या जाते. मिजुनाराने तयार पिप्यांमध्ये मद्य ठेवल्यास ती अमेरिकन लाकडांच्या पिप्यांमध्ये ठेवलेल्या मद्यापेक्षा अनोखी बनते.

(रावनाच्या वेशातील व्यक्तीने हरयाणवी गाण्यावर धरला जबरदस्त ठेका, नेटकरी म्हणाले याला आदिपुरुषमधील या अभिनेत्याच्या जागी..)

मिजुनाराद्वारे मद्य तयार करण्याची सुरुवात १९६० मध्ये झाली होती. निर्मात्यांनी खूप कमी प्रमाणात या मद्याची निर्मिती केली, त्यामुळे तिची किंमत खूप वाढली. मिजुनारा कास्कमुळे निर्माण झालेल्या दुर्मिळ चंदनाचा सुगंध, फळांच्या गोड आणि स्मोकी चवीमुळे मद्याचे शौकीन यामाझाकी ५५ ला पसंत करतात. इतकेच नव्हे तर ज्या बॉक्समध्ये ही व्हिस्की येते तो बॉक्स देखील मिजुनाराच्या लाकडापासून तयार केला जातो. त्यामुळे ही व्हिस्की खूप महाग आहे, आणि तिची मागणीही प्रचंड आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yamazaki 55 whisky single shot cost 4 7 crore ssb