साधरण शाळेतल्या सर्वाधिक मुलांचा गणित हा नावडीचा विषय असतो. गणितातली आकडेमोड, ‘x’ ‘y’, लसावी, मसावी काहीही डोक्यात शिरत नाही. तेव्हा गणित जणू काही आपला शत्रूच आहे असंच सगळ्यांना वाटतं, पण ब्रिटनमध्ये राहणाऱ्या याशा अॅशले नावाच्या १४ वर्षीय मुलाला मात्र असं काहीच वाटत नाही. गणित हा विषय त्याचा एवढा आवडीचा विषय आहे की यात त्याचा हात कोणीच धरु शकत नाही. तेव्हा गणित विषयावरचं त्याचं प्रभुत्त्व पाहून इंग्लडमधल्या लीसेस्टर विद्यापीठाने त्याला चक्क प्राध्यापकाची नोकरी देऊ केली आहे.
वाचा : मुरली विजयला पुत्ररत्न, मित्राच्या गर्भवती पत्नीसोबत केला होता विवाह
याशा हा लीसेस्टर विद्यापीठात प्रवेश घेणारा, तसेच शिकवणारा सर्वात तरुण प्राध्यापक ठरला आहे. याशाला वयाच्या तेराव्या वर्षीच विद्यापीठाकडून ही नोकरी देण्यात आल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटलं आहे. याशा अजूनही लहान आहे पण त्याचे विषयावरील प्रभुत्त्व पाहता त्यासाठी खास परवानगी विद्यापीठाकडून देण्यात आलीय. विशेष म्हणजे प्राध्यापकाच्या पदासाठी अनेक उमेदवार होते, प्रतिस्पर्धी देखील वरचढ होते परंतु या सर्वांमध्ये याशा उजवा ठरला.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तो गणितात मदत करतो. एखादं गणित अडलं तर ते सोडवण्यासाठी विद्यार्थी याशाकडे येतात. याशाला सगळेच कॅलक्युलेटर म्हणून हाक मारतात. शाळेत जाण्यापेक्षा ही नोकरी मला अधिक आवडली असं याशा मोठ्या उत्साहात प्रत्येकाला सांगतो.
Viral Video : ‘ती’ ब्रिटनच्या प्रिन्सजवळील पॉपकॉर्न चोरी करते तेव्हा…